Advertisement

आदित्यच्या पर्यटनावर नजर ठेवणार अमित ठाकरे

मनसेचे नेते अमित ठाकरे (amit thackeray) यांच्यावर राज्याच्या पर्यटन मंत्रालयावर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आदित्यच्या पर्यटनावर नजर ठेवणार अमित ठाकरे
SHARES

ठाकरे सरकारवर वचक ठेवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (mns) सोमवारी ‘शॅडो कॅबिनेट’ची (shadow cabinet,) घोषणा केली. मनसेच्या १४ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त नवी मुंबई, वाशीतील विष्णूदास भावे सभागृहात आयोजित कार्यक्रमात मनसे नेते अनिल शिदोरे यांनी या प्रतिरूप कॅबिनेटची घोषणा केली. एकूण ३० पेक्षा जास्त नेत्यांचं हे शॅडो कॅबिनेट असून यामध्ये मनसेचे नेते अमित ठाकरे (amit thackeray) यांच्यावर राज्याच्या पर्यटन मंत्रालयावर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

हेही वाचा- चांगलं काम करूनही मनसेला मतदान नाही, याला काय अर्थ आहे? - राज ठाकरे

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (Tourism minister Aaditya thackeray) महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यटन मंत्रालयाचा कारभार सांभाळत आहेत. तर या सरकारचं नेतृत्व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असताना मनसेने आपला एकही उमेदवार तिथं उतरवला नव्हता. यामुळे आदित्य ठाकरे यांचा सहज सोपा विजय झाला. परंतु शॅडो कॅबिनेटच्या निमित्ताने पहिल्यांदाच मनसेकडून ठाकरे सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातही अमित ठाकरे (amit thackeray) यांच्याकडे पर्यटन खात्याच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याने दोघा भावांमध्ये येत्या काळात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळू शकतं.

‘असं’ आहे मनसेचं शॅडो कॅबिनेट

  • गृह विधी-न्याय : बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजू उमरकर, प्रविण कदम,
  • मराठी भाषा, माहिती तंत्रज्ञान : अनिल शिदोरे, अमित ठाकरे, अजिंक्य चोपडे
  • वित्त आणि गृहनिर्माण : नितिन सरदेसाई, मिलिंद प्रधान, अनिल शिदोरे
  • महसूल आणि परिवहन : अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कुणाल माईनकर
  • ऊर्जा : शिरिष सावंत, मंदार हळबे, विनय भोईल
  • ग्रामविकास : जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे,
  • मदत पुनर्वसन, वने : संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिश सारस्वत, संतोष धुरी
  • शिक्षण : अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, अमोल रोग्ये
  • कामगार : राजेंद्र वागस्कर, गजानन राणे
  • नगरविकास, पर्यटन : संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुरकर
  • सहकार पणन : दिलिप धोत्रे, कौस्तुभ लिमये
  • अन्न व नागरीपुरवठा : राजा चौघुले, महेश जाधव

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा