Advertisement

चांगलं काम करूनही मनसेला मतदान नाही, याला काय अर्थ आहे? - राज ठाकरे

मनसेने अनेक चांगली कामं केली. लोकं आमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतात. पण मतदानाच्या वेळी कुठं जातात हेच समजत नाही, याला काय अर्थ आहे? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांनी मतदारांना उद्देशून केला.

चांगलं काम करूनही मनसेला मतदान नाही, याला काय अर्थ आहे? - राज ठाकरे
SHARES

गेल्या १४ वर्षांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (mns) अनेक चढ-उतार बघितले. पण या सगळ्या चांगल्या-वाईट काळात मनसैनिक माझ्यावर विश्वास ठेवून सोबत राहिले, याचा मला सर्वात जास्त आनंद आहे. या वर्षांत मनसेने अनेक चांगली कामं केली. लोकं आमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतात. पण मतदानाच्या वेळी कुठं जातात हेच समजत नाही, याला काय अर्थ आहे? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief raj thackeray) यांनी मतदारांना उद्देशून केला.

नवी मुंबईतील वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात सोमवारी ९ मार्च रोजी मनसेच्या १४ व्या वर्धापन दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषण करताना राज ठाकरे यांनी मतदारांबद्दलची नाराजी बोलून दाखवली. तसंच नव्या शॅडो कॅबिनेटकडून (shadow cabinet) अपेक्षाही व्यक्त केली. 

हेही वाचा- ‘असं’ आहे मनसेचं शॅडो कॅबिनेट, ठेवणार ठाकरे सरकारवर वचक

ते म्हणाले, मनसेने (mns) जाहीर केलेल्या शॅडो कॅबिनेटमध्ये अनेक जणांचा समावेश आहे. कुणाला आपण मंत्री झालोय, असं वाटू नये म्हणून आतापासूनच खबरदारी घेतलीय. या शॅडो कॅबिनेटच्या माध्यमातून सरकार जिथं चुकलं तिथं वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन करा. 

१४ वर्षे झाली. पक्षाचा प्रवास सुरू आहे. यांत माध्यमांनी प्रेम दिलं तर काही वेळेस बोचरी टीकाही केली. गेल्या १४ वर्षांच्या काळात पक्षाचे १३ आमदार निवडून आले, अनेक नगरसेवक निवडून आले. तरीही यावेळी तुमचे आमदार का नाही निवडून नाही? असं सारखं आम्हालाच विचारलं जातं. एकेकाळी काँग्रेसची केंद्रात सत्तेत होती. पण आज दिल्लीत एकही आमदार निवडून नाही आला. इतकी वर्ष राज्य केलेल्या पक्षाची अशी स्थिती होते. जेव्हा देशात लाट असते तेव्हा अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. तरी मलाच विचारतात की तुमचा पराभव का झाला? अनेक राज्यांमध्ये भाजपालाही धक्के बसत आहेत.

तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक… आव्हाडांना खुलं आव्हान

गेल्या १४ वर्षांमध्ये पक्षाने अनेक चढ-उतार बघितले, पण या चांगल्या-वाईट काळात महाराष्ट्र सैनिक माझ्यासोबत राहिले, याचा मला सर्वाधिक आनंद आहे. लोकांना सत्तेत असलेल्यांकडून अपेक्षा नाही, पण आमच्याकडून अपेक्षा आहेत. गेल्या १४ वर्षात आपण अनेक कामं केली. १० वर्षांत मनसेने जितकी आंदोलनं केली तितकी कोणीच केली नाहीत. आपण लोकांना निकालही दाखवून दिले. रेल्वे स्थानकांच्या बाहेरचे फूटपाथ मोकळे झाले. तरीही मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात कळत नाही. आमच्याकडून फक्त अपेक्षा करणार, पण आम्हाला मतदान करणार नाही, याला काय अर्थ आहे? अनेकदा मला लोकांचंही कळत नाही. काम पाहून मतदान करतात की नाहीत हा प्रश्नच आहे. काम पाहून मतदान होणार नसेल तर विषयच संपला,” अशा शब्दांत राज ठाकरेंनी आपल्या मनातील व्यथा बोलून दाखवली. 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा