Advertisement

शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांवर राज ठाकरेंचा निशाणा

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज ठाकरे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही नक्कल करत चांगलाच टोला हाणला.

शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांवर राज ठाकरेंचा निशाणा
SHARES

मनसेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं. मनसेच्या १६ व्या वर्धापन दिनाचे आजोयन पुण्यात करण्यात आलं होतं. यावेळी भाष्य करताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधारी व इतर पक्षांना धारेवर धरलं. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून राज ठाकरे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही नक्कल करत चांगलाच टोला हाणला. ''तुम्हाला शिवराय समजतात का? जर एखाद्या विषयातलं आपल्याला समजत नसेल तर त्यावर भाष्य कशाला करायचं'', अशा शब्दात राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा समाचार घेतला.

''सध्या महाराष्ट्रात महापुरुषांवरून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे. त्यात हे आपले राज्यपाल. एकदा मी त्यांना भेटायला गेलो तर वाटलं हे तर कुडमुडे ज्योतिषी आहेत की काय. त्यांनी शिवयारांबाबत एक विधान केलं. पण आपल्याला ज्या विषयातील माहिती नाही, त्या विषयावर बोलायचं कशाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण कधी रामदास स्वामींचे शिष्य असल्याचं सांगितलं नाही. ना रामदास स्वामींनी आपण शिवरायांचा गुरू असल्याचा दावा केलाय. पण रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जेवढं चांगलं लिहिलंय, तेवढं कुणीही लिहिलेलं नाही. निश्चयाचा महामेरू... हे सुभाषित आज पुन्हा वाचा'', असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.

यावेळी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अवमान करण्यावरूनही राज ठाकरेंनी राज्यपालांवर निशाणा साधला. त्यावेळी त्याकाळात लहानपणी लग्न व्हायची. बालविवाह व्हायचे. पण तुमचे अजून झाले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा