Advertisement

खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी? मनसेची मुंबईत पोस्टरबाजी

पेंग्विनसाठी लागणाऱ्या खर्चाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी? मनसेची मुंबईत पोस्टरबाजी
SHARES

पेंग्विनच्या देखभालीसाठी काढण्यात आलेल्या निविदेवरून राजकीय पक्ष आक्षेप घेऊ लागले आहेत. विरोधकांसोबतच महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनेच आता आक्षेप घेतला आहे. या पेंग्विनसाठी लागणाऱ्या खर्चाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही ठाकरे सरकारवर चांगलीच टीका करत मुंबईत पोस्टरबाजी केली आहे.

मनसेकडून मुंबईतल्या वरळीसह काही भागांमध्ये पोस्टर्स लावण्यात आली आहेत. या पोस्टरवर शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला टोला लगावल्याचं दिसून येत आहे. हा खर्च पेंग्विनला पोसण्यासाठी की पेंग्विन गँगसाठी आहे असा टोलाही मनसेनं लगावला आहे. मनसैनिक संतोष धुरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पोस्टर शेअर केलं आहे.

भायखळा इथल्या वीर जिजाबाई भोसले उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या देखभालीसाठी पालिकेनं काढलेल्या निविदेवर काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. पालिकेकडे स्वत:चे पशुवैद्यक असताना डॉक्टरांची नियुक्ती का केली जात आहे, असा प्रश्न काँग्रेस नेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. पालिकेनं काढलेल्या १५ कोटी रुपयांच्या निविदा या उधळपट्टी असल्याचं काँग्रेस पक्षानं म्हटलं आहे.

पेंग्विनच्या देखभालीसाठी होणारा खर्च हा कायमच वादाचा मुद्दा राहिला आहे. पेंग्विन देखभालीसाठी पालिकेने १५ कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागविल्या आहेत. तीन वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात येणार आहे. त्यात वैद्यकीय बाबींचाही समावेश आहे.

पालिकेकडे स्वत:चे पशुवैद्यक असताना खासगी डॉक्टरांच्या नियुक्तीला काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. करोनाकाळात पालिका अनावश्यक खर्च करत असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे. तसंच निविदा रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पेंग्विन हे उद्यानाचं आकर्षण आहे. पेंग्विन वेगळ्या वातावरणात राहतात. त्यांची काळजी घेण्यास तडजोड केल्यास त्यांच्या जिवाशी खेळण्या सारखे होईल. तेव्हा कोणतीही तडजोड होणार नाही. विरोधकांना खर्चावर आक्षेप असेल तर त्याची माहिती घेऊ. परंतु प्राणी संग्रहालयाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.



हेही वाचा

भाजपा नेते किरीट सोमय्यांना झेड सुरक्षा

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून गौरव

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा