Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून गौरव

कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गौरव करण्यात आला.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून गौरव
SHARES

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स कड़ून दखल घेण्यात आलीय. कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा `सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला आहे.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयमध्ये वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर दीपक हरके यांच्या हस्ते हा पुरस्कार अजित पवारांना देण्यात आला.

वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे (यूरोप) अध्यक्ष विल्यम जेजलर यांच्या मार्गदर्शनाख़ाली जगभरात ७० देशामध्ये कोरोनामुक्तीसाठी जनजागृती केली जात आहे. कोरोनामुक्तीसाठी कार्य करण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं या संस्थेच्या वतीनं व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित केलं जातं आहे.

वर्ल्ड बुक रेकॉर्ड ही संस्था जगभरातील विश्वविक्रमाची नोंद करण्याचं काम करते. लोकांच्यातील टॅलेंटची ओळख जागतिक स्तरावर निर्माण करून देण्याचं काम ही संस्था करते. जेणेकरून त्या क्षेत्रातील लोकांना एक भविष्यात प्लॅटफॉर्म मिळू शकेल.

कोरोना काळ सुरु झाल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने मंत्रालय स्तरावर निर्णय घेतले आहेत आणि आताही घेत आहेत. विविध विषयांवर चर्चा करतानाच आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आवश्यक निर्णयही ते घेत असतात. विशेषतः कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अजित पवारांनी जे सक्षम आणि झटपट निर्णय घेतले त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यास मदत झाली.



हेही वाचा

आरोग्य केंद्रे बंद करून मंदिरं उघडायची का? मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला

ओबीसी आरक्षण... तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यावर सर्वपक्षीय सहमती

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा