Advertisement

आरोग्य केंद्रे बंद करून मंदिरं उघडायची का? मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपाला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.

आरोग्य केंद्रे बंद करून मंदिरं उघडायची का? मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) क्षेत्रातील विविध उपक्रमांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी भाजपा (Bjp) आणि शिवसेनेचे (Shiv Sena) नेते एका व्यासपीठावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपाला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांनी आपल्या भाषणात भिवंडीतील बंद पडलेलं आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. याचाच संदर्भ धरून त्यांनी टोला लगावला.

“आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरू आहेत. यासाठी जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. धार्मिक स्थळं उघडली पाहीजेत, हरकत नाही. कपिल पाटीलजी तुमच्याकडे आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे ना? की त्याच्या ऐवजी मंदिरं उघडू आरोग्य केंद्र बंद करून. आज आरोग्याची मंदिरं ही महत्त्वाची आहेत. मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्यानं जाणार आहोत.” असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान दुसरीकडे त्यांनी फेरीवाल्यांच्या मुद्द्याला हात घालत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. “मधल्या काळात जी काही घटना ठाण्यामध्ये घडली त्यामुळे येत्या काळात आपल्याला कठोरपणे कायदा राबवावा लागेल. तिथे दया, माया, क्षमा दाखवता येणार नाही. नागरिक, माता भगिनी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आपल्यावर आहे. त्याबाबतीत कुठेही हयगय करून चालणार नाही. स्कायवॉकच नव्हे तर इतर ठिकाणी जर फेरीवाल्यांचा उच्छाद असेल. तो उच्छाद आपल्याला आटोक्यात आणावाच लागेल. त्या दिशेनं काम हे आपल्याला करावं लागेल.”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.



हेही वाचा

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आक्रमक; 'आता दया, माया, क्षमा दाखवता येणार नाही

...नाहीतर पुन्हा लागेल लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा