Advertisement

नायर रुग्णालयाचा शताब्दी सोहळा: गर्दीमुळे मुख्यमंत्री नाराज; महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या...

नायर रुग्णालयाच्या शताब्दी कार्यक्रमात झालेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.

नायर रुग्णालयाचा शताब्दी सोहळा: गर्दीमुळे मुख्यमंत्री नाराज; महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या...
SHARES

कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन केलं जात असताना शासकीय, राजकीय कार्यक्रमांमध्ये गर्दी झालेली दिसते. नायर रुग्णालयाच्या शताब्दी कार्यक्रमात झालेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्र्यांना खंत वाटणार नाही, असे कार्यक्रम आयोजित करू असे म्हटले.

मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयाचा शताब्दी कार्यक्रम सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी मंचावर राजकीय नेत्यांची गर्दी दिसत होती. शिक्षण मंत्री अमित देशमुख हे दूरदृश्‍य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. या कार्यक्रमात झालेल्या गर्दीवर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं की, मुख्यमंत्र्यांना जे दिसतं तेच बोलतात. त्यामुळेच त्यांनी आजच्या कार्यक्रमाच्या गर्दीवर बोट ठेवले. व्यासपीठावर आमच्या राजकारण्यांची गर्दी अधिक आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

त्यावर स्पष्टीकरण देताना महापौरांनी सांगितलं की, मंचावर गर्दी खूप होती हे खरं आहे. पण आम्ही मास्क घातले होते. तसंच सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करत होतो. परंतु मुख्यमंत्र्यांना ही गर्दी अपेक्षित नव्हती. त्यामुळे यानंतरचे कार्यक्रम घेताना आम्ही काळजी घेऊ. गर्दी होणार नाही आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा त्याची खंत वाटणार नाही असे कार्यक्रम आयोजित केले जातील असं महापौरांनी म्हटलं.

दरम्यान, मुंबई मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची बैठक घेतली असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. करोनाचे संकट असताना डेंग्यू, मलेरियाचे संकट वाढू नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.हेही वाचा

नायर रुग्णालयाला १०० कोटींचा निधी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कल्पिता पिंपळेंशी साधला संपर्क, फोनवरून केली विचारपूस

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा