Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कल्पिता पिंपळेंशी साधला संपर्क, फोनवरून केली विचारपूस

तुमच्या बहादुरीचे वर्णन करण्यास आपल्याकडे शब्द नसल्याचं मुख्यमंत्री कल्पिता पिंपळेंना म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कल्पिता पिंपळेंशी साधला संपर्क, फोनवरून केली विचारपूस
SHARES

फेरीलवाल्याच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर दुखापत झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे (TMC officer Kalpita Pimple) यांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी फोनवरून विचारपूस केली.

तुमच्या बहादुरीचे वर्णन करण्यास आपल्याकडे शब्द नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. आपण लवकर बऱ्या व्हा आणि इतर कोणत्याच गोष्टीची आपण काळजी करू नका असं मुख्यमंत्री म्हणाले.

त्या फेरीवाल्याला शिक्षा व्हावी अशी इच्छा कल्पिता यांनी बोलून दाखवली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, त्याची काळजी तुम्ही करू नका.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्पिता पिंपळे प्रकरणात सरकारनं मोठं पाऊल उचललं आहे. खटला लढवण्याकरता विशेष वरीष्ठ वकिलाची नेमणूक करण्यात येणार आहे. तसंच आरोपी अमरजीत यादवला जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल याबाबत सरकार प्रयत्न करणार आहे.

दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कल्पिता पिंपळे (Kalpita Pimple) यांची रुग्णालयात भेट घेतली होती. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात राज ठाकरेंनी भेट देत कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. फेरीवाल्यानं केलेल्या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या जखमी झाल्या.

त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही भेट घेत राज ठाकरेंनी कल्पिता पिंपळे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तब्येतीची काळजी घ्या, लवकर बऱ्या व्हा, फेरीवाल्यांचं काय ते आम्ही बघू असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे मनपाच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर एका फेरीवाल्यानं सोमवारी सायंकाळी हल्ला केला होता. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या हाताची बोटे कापली गेली. या घटनेनंतर हल्लेखोर फेरीवाल्याला ठाणे पोलिसांनी अटक केली.



हेही वाचा

कल्पिता पिंपळेंच्या बोटांची शस्त्रक्रिया यशस्वी, दोन्ही बोटे जोडण्यात यश

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली कल्पिता पिंपळेंची भेट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा