Advertisement

मुख्यमंत्र्यांची तुलना ब्रिटीश अधिकारी रँडशी, निर्बंधावरून मनसेची टीका

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांची तुलना ब्रिटीश अधिकारी रँडशी, निर्बंधावरून मनसेची टीका
SHARES

कोरोनामुळे (Corona) सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या. पण मनसेनं (MNS) आक्रमक पवित्रा घेत दहीहंडी उत्सव साजरा केला. त्यावर करोनाचे नियम तोडून दहीहंडी उत्सव साजरा करून काय मोठं स्वातंत्र्य मिळवलं नाही असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटलं होतं. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी उत्सवावर भाष्य केल्यानंतर संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्र्यांची तुलना ब्रिटीश अधिकारी रँडशी केली आहे. “प्लेगची साथ आहे या नावावर १८९७ साली रँडनं जनतेवर भयानक अत्याचार केले. त्यावेळी चाफेकर बंधूनी त्याला धडा शिकवला होता. आत्ताच्या आधुनिक रँडला येण्याऱ्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल हे निश्चित, असं संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मनसेनं दहीहंडी साजरी केल्यानंतर मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावरून टीका केली होती. ते म्हणाले होते की, “काही जणांनी दहीहंडी केली. हे काय स्वातंत्र्य युद्ध नाही आहे. कोरोनाचे नियम तोडून आम्ही करुन दाखवलं हे काय मोठं स्वातंत्र्य नाही मिळवलं. त्याच्यासाठी आंदोलन केलं असतं तर भाग वेगळा. हा काही सरकारी कार्यक्रम नाही की फुकट कोरोना वाटप. मास्क घालणे, हात धुणे, अंतर ठेवणे या पाळल्या नाहीत तर तिसरी लाट येऊ शकते. केंद्रानं दिलेल्या पत्रात हे नमूद केलं आहे.”

“हिंदू विरोधी सरकार आहे जे म्हणतात ना त्यांना मला ते केंद्राचं पत्र दाखवायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, दहीहंडी आणि गणेशोस्तव या काळामध्ये दक्षता पाळा. सरकार कोणत्या सणाविरुद्ध नाही तर आपण कोरोनाविरुद्ध आहोत. म्हणून मी नेहमी सांगतो आंदोलन ज्यांना करण्याची खुमखुमी आहे त्यांनी कोरोनाविरुद्ध आंदोलन करा,” असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.



हेही वाचा

गणेशोत्सवाच्या काळात तरी निर्बंध लादू नयेत - आशिष शेलार

सगळी मंदिरं उघडलीच पाहिजेत, नाहीतर…, राज ठाकरेंचा सरकारला इशारा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा