Advertisement

गणेशोत्सवाच्या काळात तरी निर्बंध लादू नयेत - आशिष शेलार


गणेशोत्सवाच्या काळात तरी निर्बंध लादू नयेत - आशिष शेलार
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट असून, गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. मात्र, नुकताच झालेल्या दहीकाला उत्सवासाठी राज्य सरकारनं लावलेली कडक निर्बंध लक्षात घेता गणेशोत्सवाच्या काळात तरी निर्बंध लादू नयेत, अशी मागणी भाजप नेते आशीष शेलार यांनी केली आहे.

सार्वजनिक दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप व मनसे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी मंगळवारी रोखले. ठाकरे सरकारची पारंपरिक पद्धतीनं दहीहंडी साजरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची दडपशाही सुरू आहे.  कोरोनाची इतकी काळजी असेल, तर आधी पब, बार, डिस्को बंद करून दाखवा, तिथे ‘वाटाघाटी’ केल्या जातात, मग उत्सवांवरही निर्बंध घालू नयेत, असे शेलार यांनी स्पष्ट केले.

पोलीस बळाचा वापर करून दहीहंड्या रोखल्या, आता पारंपरिक गणेशोत्सव साजरा करण्यावर तरी बंधने घालू नयेत, अशी अपेक्षा शेलार यांनी व्यक्त केली. दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि गर्दी न करता साजरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आमदार राम कदम यांच्यासह उत्सव साजरा करणाऱ्यांना मज्जाव करण्यात आला. डोंगरी येथे माझ्या उपस्थितीत जो पारंपरिक उत्सव साजरा होणार होता, त्यावर पोलिसांनी बंदी आणून आयोजकांवर दडपशाही केली.

कुलाब्यात कोकण विकास आघाडीचे पदाधिकारी कमलाकर दळवी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबईत मंगळवारी ठिकठिकाणी हेच चित्र होते. आम्ही ठाकरे सरकारच्या या कारभाराचा निषेध करतो. आम्ही आज शांततेने कायद्याचा सन्मान केला. गणेशोत्सव काळातही असाच पोलीस बळाचा वापर केलात, तर दडपशाही सहन करणार नाही.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा