Advertisement

सगळी मंदिरं उघडलीच पाहिजेत, नाहीतर…, राज ठाकरेंचा सरकारला इशारा

भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. म्हणजे यांच्यासाठी मंदिरं सुरु, बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही.

सगळी मंदिरं उघडलीच पाहिजेत, नाहीतर…, राज ठाकरेंचा सरकारला इशारा
SHARES

राज्य सरकारचा मनाई आदेश झुगारून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाण्यात दहीहंडी फोडल्याने पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकर परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

राज्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दहीहंडी उत्सव साजरा करण्यास राज्य सरकारने यंदा देखील बंदी घातली आहे. मात्र मनसेने सरकारला आव्हान देत आक्रमक भूमिका घेतली आहे. अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर सार्वजनिक ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा केल्यावरून पोलीस गुन्हे दाखल करत आहेत.

त्यावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, राज्यात सगळं काही सुरळीत सुरू आहे. यात्रा निघाताहेत, सभा- मेळावे होताहेत, त्यावरून हाणामाऱ्याही होत आहेत. बिल्डर कामं करून घेण्यासाठी सरकारच्या लोकांना भेटत आहेत. त्यातून कोरोना पसरत नाही, पण सण-उत्सव आले की कोरोना पसरतो. 

भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला. म्हणजे यांच्यासाठी मंदिरं सुरु, बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. आम्ही दहीडंही साजरी करायची नाही. कुठूनही गर्दी कमी झालेली दिसत आहे का? जन आशीर्वाद यात्रा झाली ती चालली. तेव्हा तुमचा लॉकडाऊन का नाही? असा प्रश्न उपस्थित करत हे सगळं जाणीवपूर्वक केलं जात आहे. सरकारला नियम लावायचेच असतील तर सगळ्यांसाठी एकच नियम लावावा. एकाला एक नियम आणि दुसऱ्याला एक नियम असं चालणार नाही. सगळे सण साजरे झालेच पाहिजेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

आजचा दिवस जाऊ द्या. नंतर मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांची बैठका घेणार आहे. त्यात आम्ही याबाबत चर्चा करूच. सगळी मंदिरं उघडलीच पाहिजेत, नाहीतर सगळ्या मंदिरांच्या बाहेर घंटानाद करू. घराबाहेर पडायला या लोकांची फाटते, त्यात आमचा काय दोष?, असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला टोला हाणला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा