Advertisement

नायर रुग्णालयाला १०० कोटींचा निधी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

नायर रुग्णालयाला १०० कोटींचा निधी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा
SHARES

मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयाला १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. नायर रुग्णालयाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

कोरोना महासाथीच्या काळात नायर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करत त्यांचे आभारही मानले. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेच्यावतीने हा निधी देण्यात येणार आहे.

नायर रुग्णालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, संस्था किंवा इमारत शंभर वर्षाची झाली असं नाही. ही निर्जीव इमारत नाही तर या सर्वांनी जीव ओतून ती सजीव केलेली इमारत आहे. मग एकदा या वास्तूत कुठलाही रुग्ण आला तरी तो बरा झालाच म्हणून समजा ही माझी धारणा, माझी भावना आहे. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही काळानुसार आधुनिकतेकडे जात आहात.

महापालिकेकडून रुग्णालयाकडून निधी येतच असेल. सरकारकडूनही निधी उपलब्ध होत असेल. मात्र, आज रुग्णालयाला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं महापालिका आणि सरकारच्यावतीनं १०० कोटींचा निधी देत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

दोन्ही खिसे माझेच नायर रुग्णालयाला १०० कोटींच्या निधीची घोषणा करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, महापालिका आणि राज्य सरकारच्यावतीने निधी देत आहोत. सध्या तरी दोन्ही खिसे माझेच आहेत. त्यामुळे आज दोन्ही खिशात हात घालून १०० कोटींचा निधी देत असल्याचे त्यांनी म्हटले.

१०० वर्षानंतरही उपयोग होईल असे कार्य करा मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलताना अपेक्षा व्यक्त करताना म्हटले की, तुम्ही सर्वांना जीवदान देऊ शकता. मग सरकार म्हणून, महापालिका म्हणून आपल कर्तव्य तर आहेच. पण १०० वर्षानिमित्त असे काही तरी काम करुन दाखवा की पुढील १०० वर्षानंतर म्हटलं गेलं पाहिजे की त्यावेळी केलेले काम आजही उपयोगी पडत आहे.



हेही वाचा

ओबीसी आरक्षण... तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यावर सर्वपक्षीय सहमती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कल्पिता पिंपळेंशी साधला संपर्क, फोनवरून केली विचारपूस

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा