मनसेची मोर्चेबांधणी

  BDD Chawl
  मनसेची मोर्चेबांधणी
  मुंबई  -  

  वरळी - मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. सोमवारी वरळी विधान सभा मतदार संघात राज ठाकरे यांनी शाखा क्रमांक १९३, १९५, १९७, १९८ आणि १९९ मधल्या गटप्रमुख आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. तसंच त्यांच्याशी संवाद साधून मार्गदर्शनही केले.

  आपल्या पक्षाचा हेतू आणि भूमिका प्रत्येकाला समजावून सांगा, असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेत. आता आळस झटकून कामाला लागा अशा बोचक शब्दात राज यांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.