Advertisement

मनसेत एकही विराट कोहली नाही?


मनसेत एकही विराट कोहली नाही?
SHARES

मुलुंड - रविवारी मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वज्रमूठ मेळावा झाला. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व होतं. या कार्यक्रमासाठी पक्षातील जेष्ठ नेते बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे तसंच अनेक पदाधिकारी, मुलुंडमधील नगरसेविका सुजाता पाठक आणि अन्य नगरसेवकही उपस्थित होते.
निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 'सामान्य जनतेच्या हृदयात जागा निर्माण करा, जनतेला न सांगताच कळलं पाहिजे की, हा मनसेचा कार्यकर्ता आहे. मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून एकही विराट कोहली नाहीये का? असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भेडसावतो आहे,' अशी भावना बाळा नांदगावकर यांनी या वेळी व्यक्त केली. या मेळाव्याला मुलुंड, भांडुपमधील मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा