Advertisement

आम्हाला माफी मागायला सांगणारा, हा वरुण देसाई आहे कोण? - अमेय खोपकर

'पेंग्विनच्या अंड्यातून आत्ता कुठे बाहेर आलेला हा वरुण सरदेसाई आहे कोण? आम्हाला माफी मागायला सांगणारा हा कोण?,' असा प्रश्न खोपकर यांनी उपस्थित केला आहे.

आम्हाला माफी मागायला सांगणारा, हा वरुण देसाई आहे कोण? - अमेय खोपकर
SHARES

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल स्पष्टीकरण द्या किंवा माफी मागा, असं आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देणारे युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर मनसे नेते अमेय खोपकर (mns leader ameya khopkar slams yuva sena secretary varun sardesai over corruption in bmc) यांनी तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. 'पेंग्विनच्या अंड्यातून आत्ता कुठे बाहेर आलेला हा वरुण सरदेसाई आहे कोण? आम्हाला माफी मागायला सांगणारा हा कोण?,' असा प्रश्न खोपकर यांनी उपस्थित केला आहे.

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी तीन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषद घेत कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह ठेवण्यासाठी ज्या शवपिशव्यांच्या वापर होतो, त्यांच्या खरेदी प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुंबई महापालिका आणि सत्ताधाऱ्यांवर केला होता. 

हेही वाचा - मनसेचा दणका, टी-सीरिजने काढलं आतिफ अस्लमचं गाणं

महापालिकेने १० मे रोजी कोरोनाबाधितांच्या मृतदेहांना ठेवण्यासाठी आवश्यक शवपिशव्या (बॉडीबॅग्ज) खरेदी करण्यासाठी टेंडर काढलं होतं. यासाठी औरंगाबादच्या वेदांत कंपनीशी संपर्क देखील साधला होता. परंतु, त्याच दिवशी विवेकानंद गुप्ता या माणसांकडून या कंत्राटासाठी त्यांच्याकडून रक्कम मागण्यात आली. ही रक्कम देण्यास नकार दिल्यावर हे कंत्राटच रद्द करण्यात आलं. त्यानंतर हे कंत्राट अतिशय हलक्या प्रतीच्या शवपिशव्या बनवून देणाऱ्या कंपनीला देण्यात आलं. या बॅग्जमध्ये कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह ठेवला तर त्यातून द्रव पदार्थ बाहेर येऊन कोरोना सारख्या महाभयंकर आजाराचा प्रचार होऊ शकतो. त्यामुळे हे कंत्राट रद्द झालं पाहिजे, अशी मागणी करत या भ्रष्टाचाराला पेंग्विन गँग जबाबदार असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला होता. त्यावर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपयोगात आणण्यात येणाऱ्या 'बॉडी बॅग्स' या केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषांनुसारच घेतल्या गेलेल्या आहेत, असा खुलासाही महापालिकेकडून करण्यात आला होता.

संदीप देशपांडे यांनी केलेल्या आरोपांमध्ये वरुण सरदेसाई यांचा नामोल्लेख केला होता. त्यामुळे सरदेसाई यांनी संदीप देशपांडे यांना मानहानीची नोटीस बजावल्याचं म्हटलं जात आहे. त्याला आधार धरूनच अमेय खोपकर यांनी सरदेसाई यांना लक्ष्य केलं आहे.

हापालिकेचा 'वरुण' गोंधळ आतून तमाशा सुरू आहे, मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचा पर्दाफाश आम्ही करणारच! पेंग्विनच्या अंड्यातून आता कुठे बाहेर आलेला हा वरुण सरदेसाई आहे कोण? हा कोण आम्हाला माफी मागायला सांगणार? संदीप देशपांडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर २४ तासांत स्पष्टीकरण द्या. आहे हिंमत उत्तर द्यायची,' असं आव्हान खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून वरुण देसाई यांना दिलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा