Advertisement

आदित्य ठाकरेंच्या ‘वरळी’ मतदारसंघात अमित ठाकरे; कोळीवाड्यातील होळीला लावली हजेरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी होळीसाठी मुंबईतील प्रसिद्ध वरळी कोळीवाड्यात हजेरी लावली. महत्त्वाचं म्हणजे वरळी हा पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे.

आदित्य ठाकरेंच्या ‘वरळी’ मतदारसंघात अमित ठाकरे; कोळीवाड्यातील होळीला लावली हजेरी
SHARES

राज्यभरात गुरूवारी होळीचा सण साजरा केला जात आहे. मात्र, दरवर्षी मुंबईतील वरळी कोळीवाड्यात होळी उत्सवाच्या एक दिवसआधी होळीचा सण साजरा केला जातो. वरळी कोळीवाड्यातील ही अनोखी होळी पाहण्यासाठी मुंबईसह आसपासच्या परिसरातून अनेकांनी मोठी गर्दी केली होती. अशातच राजकीय नेत्यांनीही या होळीला आपली उपस्थिती दर्शवली होती. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी देखील वरळी कोळीवाड्यातील होळीला हजेरी लावली होती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी होळीसाठी मुंबईतील प्रसिद्ध वरळी कोळीवाड्यात हजेरी लावली. महत्त्वाचं म्हणजे वरळी हा पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात अमित ठाकरे यांनी हजेरी लावल्याने या भेटीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी वरळीवर विशेष लक्ष दिल्याचं यातून स्पष्ट होत आहे. अमित ठाकरे यांनी मध्यरात्री 12 वाजता होळीसाठी वरळी कोळीवाड्यात हजेरी लावली. यावेळी अमित ठाकरे यांच्या हस्ते होळीचं दहन करण्यात आलं.

अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि उत्साहाच्या वातावरणात कोळीवाड्यात होळीचा सण साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कोळी बांधवांसह स्थानिकांनी गर्दी केली होती.

मुंबई आणि राज्यभरात आज होळी साजरी केली जाणार असली तरी मुंबईतल्या कोळीवाड्यात होळीच्या सणाला एक दिवस आधीच सुरुवात झाली आहे. कोळी बांधव परंपरा जपत हा सण साजरा करत असल्याचं पाहायला मिळालं. होळीनिमित्त कोळी बांधव आणि भगिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करतात आणि होळी दहन करुन गाण्यावर ठेका धरतात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा