Advertisement

‘पुनःश्च हरी ओम’ म्हणता व ‘हरी’ लाच कोंडून ठेवता? मनसेचा सरकारला प्रश्न

राज्य सरकार धार्मिक स्थळं उघडण्याची तयारी दाखवत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं आहे.

‘पुनःश्च हरी ओम’ म्हणता व ‘हरी’ लाच कोंडून ठेवता? मनसेचा सरकारला प्रश्न
SHARES

‘पुनःश्च हरी ओम’ म्हणत राज्य सरकारने राज्यातील बहुतांश सेवा-सुविधा काही अटी-शर्थींच्या आधारे सुरू केल्या आहेत. मात्र अजूनही राज्य सरकार धार्मिक स्थळं उघडण्याची तयारी दाखवत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) पुन्हा एकदा या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केलं आहे. 

पुनःश्च हरी ओम म्हणता आणि "हरी" ला च कोंडून ठेवता, असा प्रश्न मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे. या आधी देखील मंदिर उघडण्याच्या प्रश्नावरुन मनसेने राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. दुकानं, शाॅपिंग माॅल उघडायला परवानगी देता, मग मंदिर उघडण्याबाबत इतका आकस का? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी सरकारला विचारला होता. (mns leader bala nandgaonkar criticised maharashtra government over temple opening)

हेही वाचा - सरकारला मंदिर उघडण्याबाबत इतका आकस का?- राज ठाकरे

बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, पुनःश्च हरी ॐ म्हणता व "हरी" ला च कोंडून ठेवता. बार उघडले, मग बार ची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव , मल्टिप्लेक्स ला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का? काय तर्क (Logic)  असावा या मागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे.

असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारने बार उघडण्याच्या आणि वेळ वाढवून देण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. इतर सेवांना परवानगी देताना केवळ मंदिर उघडल्यावरच कोरोना पसरेल का? असा साधा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचसोबत मंदिरांवर अवलंबून असलेल्या राेजगाराच्या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.

मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्यांनी राज्यभरात आंदोलन केलं होतं. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर उघडण्याचाही प्रयत्न झाला होता. परंतु या आंदोलनाला जनतेकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. याशिवाय मनसे असो किंवा बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सगळेजण धार्मिक स्थळांशी निगडीत उद्योग व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून सरकारकडे धार्मिक स्थळं उघडण्याची मागणी सातत्याने करत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा