Advertisement

‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’, भाजपचं आंदोलन

भाजपने मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरासमोर आंदोलन केलं.

‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’, भाजपचं आंदोलन
SHARES

सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मद्याची दुकाने उघडण्यास परवानगी दिली. तर मंदिरं उघडण्यास मनाई का? असा प्रश्न उपस्थित करत भाजपने मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरासमोर आंदोलन केलं. सिद्धिविनायक मंदिरात घुसण्याच्या प्रयत्नात असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा नेते प्रसाद लाड या नेत्यांबरोबरच अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. (BJP leaders detained in Mumbai for protesting outside Siddhivinayak temple)

दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भाजप नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड आपल्या कार्यकर्त्यांसोबत प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘अधर्मी सरकार मंदिर खोलो’, ‘मदिरा चालू मंदिर बंद, उद्धवा तुझा कारभारच धुंद’ असे फलक झळकावत ठाकरे सरकारचा निषेध केला. 

राज्य सरकारने इतर सर्व व्यवहार सुरू केलेले असताना लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेली मंदिरं बंद का ठेवली आहेत? असा प्रश्न करत काहीही झालं तरी आम्ही मंदिरात प्रवेश करणारच, ठाकरे सरकारची दडपशाही सहन करणार नाही, असं म्हणत प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी कार्यकर्त्यांसह मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी अटकाव घालत कार्यकर्ते आणि या नेत्यांना ताब्यात घेतलं. 

हेही वाचा- मंदिर नाही, पण मदिरा सुरू, ही कोणती भूमिका?- देवेंद्र फडणवीस

कोरोना साथीचा प्रादुर्भाव राज्यात अद्यापही कायम असल्याने इतक्यात मंदिरं खुली करता येणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मंदिरं खुली करण्याचा मुद्दा हाती घेऊन भाजपने मुंबईसह पुणे, शिर्डी, कोल्हापूर, औरंगाबाद, सांगली इत्यादी ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काही ठिकाणी जबरदस्तीने मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही ठिकाणी मंदिरांसमोर उपोषणाला बसले आहेत.

याआधी सरकारने माॅल सुरू केले, तर मंदिरं बंद का? असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वारकऱ्यांसोबत विठ्ठल मंदिरासमोर आंदोलन करत धार्मिक स्थळं उघडण्याची मागणी केली होती. त्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल यांनी मंदिरांसोबत मशिदी सुरू करण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील मंदिरांसोबतच सर्व धार्मिक स्थळ उघडण्याची मागणी सरकारकडे केली होती.

हेही वाचा- सरकारला मंदिर उघडण्याबाबत इतका आकस का?- राज ठाकरे

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा