Advertisement

मंदिर नाही, पण मदिरा सुरू, ही कोणती भूमिका?- देवेंद्र फडणवीस

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार खासकरून शिवसेनेला टोमणा हाणला.

मंदिर नाही, पण मदिरा सुरू, ही कोणती भूमिका?- देवेंद्र फडणवीस
SHARES

मंदिर नाही, पण मदिरा सुरू! ही कोणती भूमिका आहे? हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा थोडा तरी मान ठेवा. बदला, पण इतकंही बदलू नका, असं म्हणत राज्यातील मंदिरं खुली करण्यावरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार खासकरून शिवसेनेला टोमणा हाणला. भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि प्रदेश कार्यसमिती बैठकीच्या समारोप प्रसंगी बोलताना फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं. (maharashtra opposition leader devendra fadnavis slams shiv sena over farm bill in bjp meeting)

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामान्य माणूस आज आक्रोशित आहे. डोळे मिटून दूध प्यायलं, तरी जनतेला भ्रष्टाचार दिसतो आहे. कोरोनाच्या काळात लोकं किड्या-मुंग्यांसारखे मरत आहेत. राज्यकर्त्यांना झोप कशी येते? त्यातही सरकार करते तो केवळ भ्रष्टाचार. महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्र नाही. तर १२ कोटी जनता म्हणजे महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची बदनामी करणारी ही या सरकारची कृती आहे. कोरोनाच्या काळात राजकारण करायचं नाही, असं ठरवलं होतं. पण आता भाजपा रस्त्यावर उतरेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला.

शेती विषयक विधेयक पारित होताच महाराष्ट्राने तातडीने अंमलबजावणीसाठी आदेश काढले. पण मॅडम नाराज होताच नंतर त्याला स्थगिती दिली. आता आपण बांधावर जाऊन, बळीराजाला भेटून सांगू. कोकणात वादळ आले, काहीच मिळाले नाही. विदर्भात पूर आला, तेव्हा राजा ‘उधार‘ झाला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीने पीकं उद्धवस्त झाली. पण शेतकऱ्याला कवडीची मदत मिळाली नाही. आणि मुख्यमंत्री म्हणतात ‘पिकेल ते विकेल’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं.

दरम्यान, केंद्र सरकारने नुकतेच शेती संबंधित तीन कायदे केले आहेत. या कायद्यातील त्रुटी, उणीवा दूर करणे गरजेचं आहे. या कायद्यांच्या अनुषंगाने शेतकरी प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत विचारविनिमय केला जाईल, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कायद्याला राज्यात स्थगिती दिली आहे.


हेही वाचा - 

राऊत, फडणवीस भेटीमागे ‘हे’ खरं कारण

रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल- देवेंद्र फडणवीस




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा