Advertisement

कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम की..?, मनसेचा खोचक सवाल

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अखेर राज्य सरकारने पुन्हा नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. या त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम की..?, मनसेचा खोचक सवाल
SHARES

सातत्याने जनजागृती करण्यात येऊन देखील राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. यामुळे कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अखेर राज्य सरकारने पुन्हा नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. या त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (mns) प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी सरकारच्या कार्यक्षमेवर देखील यानिमित्ताने हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा, गुजरात, कर्नाटक मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश अशा राज्यांमध्ये कोरोना वाढलेला नसताना केवळ महाराष्ट्रातच कोरोना कसा काय वाढतोय, याकडे संदीप देशपांडे यांनी लक्ष वेधलं आहे. त्यामुळे कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारचं कोरोनावर प्रेम आहे? की स्वतःचं अपयश झाकण्यासाठी टाळेबंदी आणि कोरोना चा वापर होतोय? असे प्रश्न त्यांनी ठाकरे सरकारला विचारले आहेत.

हेही वाचा- मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६५ दिवसांवर

कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याने मुंबईत कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही मोठ्या प्रमाणावर घटला आहे. मुंबईत रोज १०-१२ दिवसांनी रुग्ण दुपटीचा कालावधी घटत आहे. सध्या मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी १६५ दिवसांवर आला आहे. 

मुंबईत सोमवारी कोरोनाचे (coronavirus) नवीन १७१२ रुग्ण आढळले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईमधील कोरोना वाढीचा दर सरासरी ०.४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. 

तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण एक टक्क्याने घसरून ९२ टक्के झालं आहे.मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या तीन लाख ४५ हजार ६५९ वर पोहोचली आहे. तर ११ हजार ५३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी १०६३ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत  तीन लाख १८ हजार ६४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

मुंबईत सध्या १४ हजार ५८२ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ३१ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आल्या आहेत. तर २२० इमारती सील केल्या आहेत. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा