Advertisement

लाथो के भूत बातों से नही मानते, वीज बिलावर मनसेचं सूचक विधान

वीज बिलाच्या प्रश्नावर पुढाकार घेणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.

लाथो के भूत बातों से नही मानते, वीज बिलावर मनसेचं सूचक विधान
SHARES

राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी लॉकडाऊन दरम्यान ग्राहकांना आलेल्या वाढीव वीजबिलांमध्ये दिलासा देण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिल्यानंतर आता या प्रश्नावर पुढाकार घेणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे.

वीज बिला संदर्भात निवेदन, अर्ज, बैठका, विनवण्या सगळं झालं. पण सरकार ढिम्म आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी साहेबांच्या आदेशानंतर रस्त्यावर संघर्ष करावाच लागेल कारण"लाथो के भूत बातों से नही मानते" असं ट्विट मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलं आहे. यावरून आता मनसे सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वीजबिला प्रश्नासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांची भेट घेतली होती. राज्य सरकारला अनेक निवेदने पाठवून पण सरकारने उत्तरं दिली नाही. ऊर्जा विभाग म्हणतं महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने मंजुरी दिल्यास वीजबिल माफी करायला आमची हरकत नाही. नियामक आयोग देखील हेच म्हणतं तर घोडं कुठं आडलं आहे? असा प्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला होता. शिवाय जनतेच्या संयमाची परीक्षा पाहू नका असा इशारा देखील दिला होता.

तर, दोन दिवसांपूर्वीच महावितरणनं वीज बिल वसुलीचे आदेश काढले आहेत. त्यावर बोलताना राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून कोणताही दिलासा मिळणार नाही. मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. 

ग्राहकांना दिलासा मिळावा म्हणून मी पूर्ण प्रयत्न केले. मात्र केंद्र सरकारनं यात मदत केली नाही. ६९ टक्के वीज बिल वसुली पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता सवलत देण्याचा विषय बंद झाला आहे. महावितरण ६९ हजार कोटींच्या तोट्यात आहे. आता आम्ही कर्ज काढू शकत नाही, असंही नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा