Advertisement

पत्री पुलाचं गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान नाही, मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला

कल्याणमधील पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगचं काम पाहण्यासाठी आलेले पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना मनसे आमदार राजू पाटील यांना टोला हाणला आहे.

पत्री पुलाचं गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान नाही, मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला
SHARES

कल्याणमधील पत्री पुलाच्या गर्डर लाँचिंगचं काम पाहण्यासाठी आलेले पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना मनसे आमदार राजू पाटील यांना टोला हाणला आहे. पत्री पुलाचं गर्डर लाँचिंग म्हणजे चांद्रयान नाही.आदित्य यांनी इतर पुलांची कामंही मार्गी लावावीत, असं म्हणत राजू पाटील यांनी इतर पुलांच्या रखडलेल्या कामांकडेही लक्ष वेधलं.

पत्री पुलाचं काम बराच काळापासून रखडल्याने कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये याबाबत संताप आहे. विलंबाने का होईना, परंतु कल्याण मधील पत्री पुलाचे गर्डर बसविण्याच्या कामाला शनिवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. दोन दिवस गर्डर बसविण्याचं काम चालणार असून त्यासाठी मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक देखील घेण्यात आला आहे. 

हेही वाचा- कल्याण 'पत्री' पुलाच्या कामासाठी पॉवर ब्लॉक


मनेसेचे आमदार राजू पाटील (mns mla raju patil) पत्री पुलाजवळील ९० फीट रस्त्यावरील अर्धवट कामाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी पत्री पुलाजवळ असल्याचं त्यांना कळालं. त्यांची भेट घेण्याकरीता राजू पाटील मनसे कार्यकर्त्यांसोबत पत्री पूल परिसरात येताच पोलिसांनी त्यांना रोखलं. थोड्याफार वादावादीनंतर आयुक्त तिथून निघून गेल्याचं कळातचं राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी आयुक्तांशी फोनवर बोलणी सोमवारी भेट घेण्याचं ठरवलं.

त्यानंतर गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray), पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. त्यावर पत्री पुलाच्या कामाला आधीच विलंब झाला आहे. त्याचं गर्डर लॉचिंग म्हणजे चंद्रयान नाही. आदित्य ठाकरे यांचं डोंबिवली हे आजोळ आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी केवळ पत्री पुलाच्या कामाची पाहणी न करता ठाकूर्ली ते माणकोली खाडी पूल, कोपर पूल, पलावा पूल, आंबिवली येथील रेल्वे उड्डाण पूल अशा अन्य रखडलेल्या पुलाच्या कामातही लक्ष घालावं, असा टोला आधीच संतापलेल्या राजू पाटील यांनी लगावला.

(mns mla raju patil criticised aaditya thackeray over delay work of kalyan patri bridge)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा