Advertisement

घुसखोरांविरूद्ध ‘मनसे’चा मोर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची भूमिका घेतली आहे. घुसखोरांविरोधात मनसेच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.

घुसखोरांविरूद्ध ‘मनसे’चा मोर्चा
SHARES
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक सूची (एनआरसी) यावरून देशभरात प्रचंड वाद सुरू आहेत. ठिकठिकाणी आंदोलन देखील करण्यात येत आहेत. अस असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याची भूमिका घेतली आहे. घुसखोरांविरोधात मनसेच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

मरिन लाइन्स येथील हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरूवात होणार आहे. रविवारी दुपारी १२ वाजता मोर्चा काढण्यात येणार असून, आझाद मैदानात राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांविरूद्ध काढण्यात येणाऱ्या मनसेच्या मोर्चामध्ये मुंबईसह राज्यभरातून हजारोच्या संख्येन लोक सहभागी होणार आहेत. या मोर्चासाठी अनेकांनी रात्रीच मुंबईची वाट धरली. तर मुंबई आसपास असलेल्या जिल्ह्यांतून सकाळी मनसे कार्यकर्त्यांसह नागरिक मोर्चासाठी रवाना झाले आहेत. 

या मोर्चाची मनसेनं जोरात तयारी केली असून, मुंबईत सर्वत्र होर्डिग्ज झळकत आहेत. मोर्चात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना काही गोष्टी टाळण्याचं आवाहन पक्षाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 'सर्व महाराष्ट्र सैनिक व देशप्रेमी नागरिकांनी एवढ्या मोठ्या मोर्चात खबरदारी घेणं जरुरी आहे. काही जण या मोठ्या मोर्चात वेगळ्या उद्देशानं येतात, त्यांना तशी संधी अजिबात देऊ नये. त्यामुळे सहभागी होणारे कार्यकर्ते व देशप्रेमी नागरिक यांनी कोणत्याही प्रकारची पिशवी, बॅग, बाटली, मौल्यवान वस्तू आणणे टाळावे. तसेच आपल्या मोबाईलचीही काळजी घ्यावी. मोर्चात कटाक्षाने प्लॅस्टिकचा वापर टाळून निसर्गाची काळजी घेणे जरूरी आहे,' असं आवाहन पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement