Advertisement

जनसंपर्क वाढवण्यासाठी 'मनसे'चा आधार?


जनसंपर्क वाढवण्यासाठी 'मनसे'चा आधार?
SHARES

वरळी - पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्ष जनसंपर्क वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यात मनसे कशी मागे राहील. जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी सोमवारी वरळी विधानसभा शाखा क्र. 196चे मनसे शाखा अध्यक्ष दशरथ निकम यांनी पॅनकार्ड आणि आधारकार्डचं वाटप केलं. हा कार्यक्रम वरळी बीडीडी येथे पार पडला. या कार्यक्रमाला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तर हे फक्त निवडणूक जवळ आली आहे म्हणून आज सामान्य नागरिक आठवतो असं तिथले रहिवासी मंगेश चौगुले यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement