Advertisement

'डबे जोडण्याच काम सुरू', राज ठाकरेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या या विधानामुळे पुन्हा एकदा मनसे आणि शिंदे गटाच्या युतीसंदर्भातील चर्चांना उधाण आले आहे.

'डबे जोडण्याच काम सुरू', राज ठाकरेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण
SHARES

राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा 17 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. राज ठाकरे नागपुरसाठी विदर्भ एक्स्प्रेसने १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता निघणार आहे. 20 सप्टेंबरला 1 दिवसीय चंद्रपुर दौरे करणार आहे. त्यानंतर 21 सप्टेंबरला राज ठाकरे अमरावतीला जाणार आहे. 

21 आणि 22 सप्टेंबरला मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहे. त्यानंतर २३ सप्टेंबर रोजी मुंबईसाठी अमरावतीवरून अंबाई एक्स्प्रेसने मुंबईकडे प्रस्थान करणार आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मनसे नेते आणि सरचिटणीस यांच्यासोबत ठाकरे यांची बैठक पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आजची पक्षाची अंतर्गत बैठक आहे. त्यामुळे आज कुणी काही बोलणार नाही. आज अंतर्गत बैठक आहे, इतका मसाला काही आज मिळणार नाही पण डबे जोडण्याचं काम सुरू आहे, असं सूचक विधान राज ठाकरेंनी केलं.

तसंच, मी विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहे. मी पहिल्यांदा नागपूरला जात नाहीये. यापूर्वी जेव्हा गेलो तेव्हा रेल्वेनेचं जातो. लांबचा प्रवास आहे त्यामुळे रेल्वे बरी पडते, त्यामुळे जेट लेग होत नाही, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.

शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेची जवळीक वाढत चालली आहे. शिंदे गट किंवा भाजपसोबत आगामी निवडणुकीमध्ये युती होण्याची चर्चा रंगली आहे. तर खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'डबे जोडण्याच काम सुरू आहे' असं सूचक विधान केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.



हेही वाचा

दादर : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल

शिंदे गट विरुद्ध शिवसेनेतील वाद पेटला! सदा सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा