Advertisement

शिंदे गट विरुद्ध शिवसेनेतील वाद पेटला! सदा सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप

शनिवारी रात्री उशिरा शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक भिडलेत.

शिंदे गट विरुद्ध शिवसेनेतील वाद पेटला! सदा सरवणकरांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप
SHARES

शिंदे गट आणि  शिवसेनेतील वाद टोकाला गेल्याचं दिसून येतंय. शनिवारी रात्री उशिरा शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक भिडलेत. महत्त्वाचं म्हणजे यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला आहे.

आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांनी मात्र आपल्यावर केलेले आरोप माध्यमांशी बोलताना फेटाळून लावलेत. एका घरगुती प्रकरणाचा वाद झाल्याचं सरवणकर यांनी म्हटलंय.

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांनी गंभीर आरोप केला आहे.

सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप सुनील शिंदे यांनी केलाय. या गोळीबारात एक पोलीस जखमी होता होता वाचल्याचंही ते म्हणाले. दादर पोलीस स्थानकाच्या आवारात सरवणकर यांनी गोळीबार केला, असा त्यांनी आरोप केलाय.

शिवसेनेकडून गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीसाठी स्वागत कक्ष उभा करण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वागत कक्ष उभारला गेला होता. पण शिंदे गटातील शाखा प्रमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना हे सहन झालं नाही, असा आरोप सुनील शिंदे यांनी केला आहे. त्यावरुनच हा वाद झाला.

शिवसेनेच्या नगरसेवकांना शिंदे गटाचे कार्यकर्ते नको त्या भाषेत बोलत असतात. त्यांना सत्तेचा माज आला आहे. सोशल मीडियावरही आक्षेपार्ह भाषा वापरली जात असल्याचंही सुनील शिंदे यांनी म्हटलंय. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा