मनसेकडून अणेंचा निषेध


  • मनसेकडून अणेंचा निषेध
  • मनसेकडून अणेंचा निषेध
SHARE

ताडदेव - विदर्भवाद्यांना मनसेकडून होत असलेला विरोध दिवसेंदिवस तीव्र होत आहे. अखंड महाराष्ट्राचे विभाजन करू पाहणा-या अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या विरोधात बुधवारी ताडदेव येथील सोबो सेंट्रल मॉल बाहेर मनसे विभागाध्यक्ष धनराज नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

मनसे कोणत्याही अणे, चणे, फुटाण्यांचे मनसूबे पूर्ण होऊ देणार नाही. महाराष्ट्राचे विभाजन होऊ देणार नाही. अखंड महाराष्ट्राचा विजय असो, अशा घोषणा देत मलबारहिल विधानसभेतील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अणे यांच्या प्रतिमेला चपलांचा प्रसाद दिला आणि त्यांच्या प्रतिमेचे दहन करून निषेध व्यक्त केला. प्रशासनाने योग्य कारवाई न केल्यास या निषेधाचे रूपांतर तीव्र आंदोलनात करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात मनसे मुंबादेवी विभागाध्यक्ष केशव मुळे, शाखा अध्यक्ष दिपक कांबळे, भालचंद्र पालकर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या