Advertisement

मनसेचे मराठी पाट्यांसाठी कल्याणमध्ये आंदोलन


मनसेचे मराठी पाट्यांसाठी कल्याणमध्ये आंदोलन
SHARES

महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी कल्याणमध्ये मराठी फलक नसलेल्या दुकानांच्या पाट्यांना काळं फासले. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई यांच्या हॉटेलवर इंग्रजीतून नाव असलेल्या पाटीला देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. मराठी मुद्द्यावर नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेचे शहराध्यक्षांच्या हॉटेलवर लावण्यात आलेले फलक इंग्रजीतून कसे याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे.

विशेष म्हणजे सोमवारी शिवसेनेने फेरीवाल्यांच्या विरोधात डोंबिवलीमध्ये हल्ले केले होते. त्याप्रकरणात काही शिवसैनिकांनाही अटक झाली होती. फेरीवाले आणि दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या आधीही आंदोलन केले आहे. मराठीत दुकानांची नावे लिहण्याचा नियम असतानाही बरीच दुकाने आणि हॉटेल्सवरील फलकांवर इंग्रजी नाव मोठ्या आकारात तर मराठी नाव छोट्या आकारात का लिहले जाते, असा प्रश्न करत मनसेने हे आंदोलन केले.

सोमवारी डोंबिवली स्टेशनच्या बाहेर शिवसैनिकांनी फेरीवाल्यांच्या गाड्यांची नासधूस केली होती. मंगळवारी मनसेकडून मराठी पाट्यांबाबत आंदोलन केले आहे. दोन्ही पक्ष आपल्या मराठी मुद्द्यांवर पुन्हा येऊ पाहत आहेत. काही दिवसात मुंबईत अशा प्रकारचे वातावरण दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा