Advertisement

दिवाळीनंतर राज ठाकरेंचा अयोध्या दौरा? माँ कांचनगिरींच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, माँ कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांची आज कृष्णकुंजवर भेट झाली.

दिवाळीनंतर राज ठाकरेंचा अयोध्या दौरा? माँ कांचनगिरींच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, माँ कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांची आज कृष्णकुंजवर भेट झाली. सुमारे अर्धा तास त्यांच्यात चर्चाही झाली. या भेटीवेळी राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्याचं निमंत्रण देण्यात आलं आणि राज ठाकरे यांनीही ते स्वीकारलं आहे.

राज ठाकरे नववर्षाच्या तोंडावर म्हणजे डिसेंबरमध्ये अयोध्येचा दौरा करणार असल्याची माहिती मिळतेय. आपल्या पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर मागील दोन वर्षापासून राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळले आहेत. त्यानंतर नववर्षाच्या तोंडावर अयोध्या दौरा घोषित करुन राज ठाकरे यांनी हिंदू राष्ट्राचा अजेंडा हाती घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

राज ठाकरे, कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांची ही भेट ठरवून झाली आहे. दोन्ही महाराज आहे. या भेटीत हिंदू राष्ट्र हा अजेंडा होता. राज ठाकरे यांच्यासारखा माणूस त्यांना हिंदूराष्ट्रासाठी योग्य वाटतो, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय.

मध्यंतरी राज ठाकरे अयोध्येला जाणार होते, पण कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळो तो दौरा रद्द करावा लागला. अयोध्येच्या आखाड्यातून अनेक लोक बोलावत आहेत. आजोबा, पणजोबापासून हिंदुत्व त्यांच्यात भिनलं आहे. राज ठाकरे हे कणखर हिंदुत्व मांडू शकतात. देशातून भावना आहे की राज ठाकरे यांनी आक्रमकपणे हिंदुत्व दाखवलं पाहिजे. उत्तर भारतीयांबाबत कोणतेही गैरसमज नव्हते. ते माध्यमांनी निर्माण केले. त्यावेळी राज्य विकासाला न्या ही एक भावना होती, असंही नांदगावकर म्हणाले.

दरम्यान, २३ तारखेला भांडूपमधील मेळाव्यात सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील, असंही नांदगावकर म्हणाले.

गुरु माँ कांचन गिरी या जुना आखाड्याशी संबंधित आहेत. त्या महिला संत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या दिल्लीच्या सेक्टर-5 मधील वैशाली येथे राहतात. त्यांनी मधल्या काळात देश बचाओ आंदोलन सुरू केलं होतं.

हिंदू राष्ट्र व्हावं म्हणून त्यांनी देशभर दौरे सुरू केले आहेत. महाकाल मानव सेवा समितीच्या बॅनरखाली त्यांनी हे अभियान सुरू केलं आहे. त्यांनी देशातील अनेक भागात हिंदूराष्ट्र स्थापन्याचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. हिंदुराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी म्हणून त्यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेशासह विविध राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.हेही वाचा

मुंबई महापालिका निवडणूक: राज ठाकरे घेणार भांडुपमध्ये मेळावा

'गर्व से कहो हम हिंदू है'; मनसेनेचा हिंदुत्वाचा नारा, शिवसेना भवनासमोर लावला बॅनर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा