Advertisement

मुंबई महापालिका निवडणूक: राज ठाकरे घेणार भांडुपमध्ये मेळावा

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भांडुपमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणूक: राज ठाकरे घेणार भांडुपमध्ये मेळावा
SHARES

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भांडुपमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. २३ ऑक्टोबरला हा मेळावा घेणार असून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षबांधणी, राजकीय रणनीती याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.

मागील विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत मनसेला राज्यात फारसे यश मिळाले नव्हते. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसेनं कंबर कसली आहे. त्यानुसार नाशिक, पुणे, ठाणे मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या ठिकाणी मनसेकडून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

राज स्वत: या महापालिकांकडे बारकाईने लक्ष देत आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षबांधणी, राजकीय रणनीती याबाबत राज मार्गदर्शन करतील, अशी माहिती मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली.

मुंबई महापालिकेत मागील निवडणुकीत मनसेचे ७ नगरसेवक निवडून आले होते. यातील ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळं मनसेचा फक्त एक नगरसेवक आहे. महापालिकेसाठी मनसेने ६ महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. सर्व नेत्यांना विभागवार जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात अमित ठाकरे यांचाही समावेश आहे.

२०१७च्या महापालिका निवडणुकीत मनसे मुंबईत एकूण ४० वॉर्डात दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यामुळे मनसेकडून या ठिकाणी अधिक लक्ष दिले जात आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा