Advertisement

'गर्व से कहो हम हिंदू है'; मनसेनेचा हिंदुत्वाचा नारा, शिवसेना भवनासमोर लावला बॅनर


'गर्व से कहो हम हिंदू है'; मनसेनेचा हिंदुत्वाचा नारा, शिवसेना भवनासमोर लावला बॅनर
SHARES

दरवर्षी विजयदशमी दिवशी म्हणजे दसऱ्याला शिवतीर्थावर (शिवाजी पार्क मैदान) शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. हजारोंच्या संख्येत शिवसैनिक या मेळाव्याला हजर असतात. मात्र गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा दसरा मेळावा दूरदृष्टी प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आला होता. परंतु यंदा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दसरा मेळावा ऑनलाइन नसून ऑफलाइन होणार आहे. त्यानुसार तयारीला ही सुरवात झाली आहे. दरम्यान एकीकडं शिवसैनिक दसरा मेळाव्याची तयारी करताहेत तर दुसरीकडे मनसेनं हिंदुत्वाचा नारा दिला आहे. 

मुंबईत दसऱ्याच्या शुभेच्छा देताना राज ठाकरे यांच्या मनसेने हिंदुत्वाचा नारा दिला आहे. मनसेने शिवसेना भवना समोरच 'गर्व से कहो हम हिंदू है' चा बॅनर लावला आहे. याखेरीज मुंबईत काही ठिकाणी असे पोस्टर्स लावण्यात आलेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मनसेने केला आहे.

शिवसेनेची स्थापना झाली ती मुळात हिंदुत्वाचा नारा देत आणि मराठी माणसाठी शिवसेना. आता शिवसेनेचा हा मुद्दा मनसेने हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गडात अर्थात दादरमध्ये तेही शिवसेना भवनासमोर बॅनर झळकवले आहे. त्यामुळे आता शिवसेना बॅनरच्या माध्यमातून उत्तर देणार की थेट दसरा मेळाव्यात खडेबोल सुनावणार याची उत्सुकता आहे.

आता या बॅनरवरुन राजकारण तापणार हे स्पष्ट होत आहे. आगामी पालिका निवडणुकीत हा मुद्दा पुढे येण्याची शक्यता आहे.

मुंबईत आज शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्याची शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या दसरा मेळाव्याला हजारो शिवसैनिक उपस्थित राहू शकणार आहेत. बंदीस्त सभागृहातील उपस्थिती मर्यादा शिथिल करण्यात आली आहे.

षण्मुखानंद सभागृहाच्या पूर्ण क्षमतेने प्रवेशाची शक्यता आहे. षण्मुखानंद सभागृहाची आसन क्षमता ३ हजार आहे. त्यामुळे या मेळाव्यात शिवसेनेचा जोश दिसणार हेच दिसून येत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा