टाळीचा बेत फसल्यानंतर लवकरच मनसेची पहिली यादी?

  Mumbai
  टाळीचा बेत फसल्यानंतर लवकरच मनसेची पहिली यादी?
  मुंबई  -  

  दादर - मनसेने युतीसाठी दिलेली टाळी शिवसेनेने झिडकारल्याने अखेर मनसे लवकरच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. रविवारी युतीच्या चर्चेसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मातोश्रीचे दरवाजे ठोठावले. मात्र सोमवारी उद्धव ठाकरे यांनी आपल्याकडे युती बाबतचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे सांगत मनसेने देऊ केलेल्या टाळीला टोला लगावला. त्यामुळे मनसे आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत असल्याचे माहिती मिळते आहे.

  विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 7 वेळा फोन करूनही शिवसेनेकडून काहीच प्रतिसाद आला नाही. विधानसभा निवडणुकीच्यावेळी ‘एक ही मारा पर सॉलिड मारा’ असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचले होते. त्यावेळी शांत राहिलेल्या उद्धव ठाकरेंनी यावेळी मात्र संधी मिळताच त्या डायलाॅगची सव्याज परतफेड केली आहे. गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने मनसेसमोर युतीसाठी हात पसरला होता. मात्र त्यावेळी मनसेने शिवसेनेसोबत युती करणं टाळलं होतं. मात्र आता परिस्थिती उलट झाली असून छोट्या भावाला मोठ्या भावासोबत युती करायची आहे, मात्र मोठ्या भावाने छोट्या भावाला झिडकारून लावले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.