राज पुसले, मोदी दिसले!

दादर - आगमी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जाहीरातबाजीला उत आल्याचं सगळीकडे पाहायला मिळत आहे. त्यातच आता नवा वाद निर्माण झालाय तो कोहीनूर स्क्वेअरच्या भिंतीवरील बॅनरबाजीवरून. हा वाद झालाय मनसे आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये. कोहिनूर स्क्वेअर भिंतीवर याधाही मनसेची जाहीरात होती. मात्र गुरूवारी रात्री अचानक भिंतीवरील राज ठाकरे गायब झाले आणि त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं चित्र पाहायला मिळालं. भाजपा कार्यकर्त्यांनी मनसेची जाहीरात पुसून शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं मोदींची जाहिरात लावली. आता एवढं सगळं घडल्यावर मनसे कार्यकर्ते तरी कसे गप्प राहतील? मनसे कार्यकर्त्यांनी भिंत आमच्या पक्षाची असल्याचा दावा करत भाजपाची जाहीरात हटवलीय. गुरुवारी राम मंदिरच्या वादावरून झालेला भाजपा-शिवसेना कार्यकर्त्यांचा धिंगाणा अख्या महाराष्ट्रानं पाहिला. त्यातच आता मनसे आणि भाजपाचा पोस्टरबाजीचा वाद समोर आलाय. त्यानिमित्तानं एरवी शिवसेनेशी भांडण्याची सवय जडलेल्या भाजपाला भांडणासाठी मनसेच्या रुपानं नवा भीडू मिळालाय हे मात्र नक्की.

Loading Comments