कुर्ल्यात मनसेच्या विजयी उमेदवारावर हल्ला

कुर्ला - प्रभाग क्रमांक 166 मध्ये मनसेचे विजयी उमेदवार संजय तुरडे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आलीयेा. हा हल्ला शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप संजय तुरडे यांनी केला आहे. महापालिका निवडणुकीत विजयी झाल्याचा आम्ही आनंदोत्सव साजरा करत होतो. पण भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी येऊन माझ्यावर हल्ला केला. चाकू आणि दगडांनी आमच्यावर हल्ला करण्यात आला. यात माझ्यासोबत माझे कार्यकर्तेही जखमी झालेत, असा आरोप संजय तुरडे यांनी केलाय.

Loading Comments