Advertisement

नवाब मलिकांना जामीन नाकारला, ७ मार्चपर्यंत कस्टडी

न्यायालायनं मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांच्या कोठडीत वाढ केली.

नवाब मलिकांना जामीन नाकारला, ७ मार्चपर्यंत कस्टडी
SHARES

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money Laundering) अटकेत असलेल्या नवाब मलिक यांना जामीन देण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. न्यायालयानं मालिकांच्या ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ केली आहे.

प्रकृती अस्वस्थ्यामुळे मलिक यांची चौकशी अपूर्ण राहिली होती, असं सांगत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मालिकांची कोठडी वाढवावी अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालायने मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळत त्यांच्या कोठडीत वाढ केली.

मुंबई सत्र न्यायायातील विशेष पीएमएलए न्यायलायानं ५ दिवसांची कोठडी नवाब मलिक यांना वाढून दिली आहे. तपास यंत्रणेनं ६ दिवसांची कस्टडी मागितली होती. मात्र न्यायालयानं त्यांना ७ मार्चपर्यंतची कस्टडी दिली आहे.

पहिल्यांदा न्यायालयानं त्यांना कोठडी सुनावली होती, त्यात २५ ते २८ फेब्रुवारी असे तीन दिवस नवाब मलिक प्रकृती अस्वस्थ्याच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे या तीन दिवसात चौकशी होऊ शकली नाही.

यासोबतच तपासातून जी नवीन माहिती पुढे आली आहे, त्यात काही साक्षीदारांनी सांगितलं की, नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी आर्थिक संबंध होते, असा युक्तिवाद करत ईडीनं न्यायालयात मलिक यांच्या कोठडीत वाढ करण्यात मागणी केली होती.



हेही वाचा

मंत्री नवाब मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता

नवाब मलिकांविरोधात पोस्टरबाजी, बॅनरवर दाऊदचाही फोटो

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा