Advertisement

मंत्री नवाब मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता

मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडी कोठडीत असणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्यची शक्यता आहे.

मंत्री नवाब मलिकांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता
SHARES

मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडी कोठडीत असणारे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्यची शक्यता आहे. मनी लॉंड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिक यांच्याबाबत नवी माहिती ईडीच्या हाती लागली आहे. शिवाय राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, या अधिवेशनात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची भाजपाकडून केली जात आहे. त्यामुळं नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी ईडीनं कुर्ल्यातील  एकर जमिनीच्या व्यवहारात झालेल्या मनी लाँड्रिंगच्या आरोपात मलिक यांना अटक केलीआता ईडीच्या हाती नवी माहिती लागली आहेमुंबईतील बीकेसीमध्ये नवाब मलिक यांच्याशी संबंधित आणखी एक मालमत्ता असल्याची माहिती मिळाली आहे

मिळालेल्या माहितीनुसारबीकेसीतील भूखंड हा जवळपास २०० कोटी रुपये किंमतीचा आहेईडीच्या सूत्रांनुसारनवाब मलिक यांचे पुत्र फराज याची टचवूड रिअल इस्टेट या कंपनीत २५ टक्के भागीदारी आहे आणि हा भूखंड या कंपनीशी संबंधित आहे. हा भूखंड २००६ साली खरेदी करण्यात आला होतात्याच्या पैशांची देवाणघेवाण ३ वेळा वेगवेगळ्या खरेदीदारांच्या माध्यमातून झाली होती.

ईडीकडून पैशांच्या देवाणघेवाणीशी संबंधित व्यक्तींकडेही चौकशी करण्यात येत आहेटचवुड रिअल इस्टेट कंपनीनं अन्य एका कंपनीसोबत १२.७ कोटी रुपयांचे ट्रान्जेक्शन केलेले आहेअशी माहिती तपासात उघड झाल्याचे समजतेआता ही कंपनी ईडीच्या रडारवर असूनत्या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीने राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली आहे३ मार्चपर्यंत ते ईडी कोठडीत असून, त्यांची ईडी कोठडी गुरूवारी संपत आहेत्यामुळे गुरूवारी त्यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा