Advertisement

नवाब मलिकांविरोधात पोस्टरबाजी, बॅनरवर दाऊदचाही फोटो

मलिकांसोबत फोटोत दाऊदचा फोटोही लावण्यात आला आहे.

नवाब मलिकांविरोधात पोस्टरबाजी, बॅनरवर दाऊदचाही फोटो
SHARES

मुंबईत ठिकठिकाणी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी वादग्रस्त बॅनरबाजी सुरू झाली आहे. अज्ञात व्यक्तीकडून मुंबईच्या अनेक भागात मलिकांच्या फोटोची बॅनेरबाजी सुरू आहे. मलिकांसोबत फोटोत दाऊदचा फोटोही लावण्यात आला आहे.

महाविकास आघाडी सरकारनं नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावी अशी मागणी लावून धरली आहे. अशातच मुंबईतील काही भागात मलिकांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करणारे बॅनर्स लावण्यात आले आहे. त्यात नवाब मलिक आणि दाऊदचा फोटो मुंबई ब्लास्टच्या बातमीसह लावण्यात आले आहे. हे बॅनर कोणी लावले हे अद्याप उघड झालेले नाही.

दाऊदच्या गुर्ग्या नवाब मलिकला मुख्यमंत्री का वाचवतात? मुख्यमंत्री नवाब मलिकांचा राजीनामा घ्या! अशी मागणी बॅनेरबाजीतून करण्यात आली आहे. अज्ञातानं लावलेल्या या बॅनेरमध्ये 'द हिंदुस्तान टाईम्स'या वृत्तपत्राची मुंबई ब्लास्टची बातमी आहे. तसंच मलिक आणि दाऊदचा फोटो देखील लावण्यात आला आहे.

आजपासून विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. भाजपनं मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

‘दाऊदच्या दलला मंत्र्यांचा राजीनामा घ्या’, ‘महाराष्ट्राचे सरकार दाऊदचे समर्थक आहे का?’ अशी वाक्य या बॅनरवर लिहिण्यात आलेली. ‘दाऊद के दलालो को… को जूते मारो सालों को,‘नवाब मलिक कौन है?… दाऊद का दलाल है…’ अशा घोषणा यावेळी भाजपाच्या आमदारांनी दिल्या.

यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासहीत भाजपाने इतर अनेक भाजपाचे आमदार उपस्थित होते. हे सरकार दाऊद समर्पित असल्याची टीका करत फडणवीस यांनी बुधवारी सरकारची कोंडी करण्याचे संकेत दिले.



हेही वाचा

‘दाऊद के दलालो को…,’ ‘नवाब मलिक कौन है?…’; भाजपाची घोषणाबाजी

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा