उत्तर प्रदेशातील राजकीय वादळाचा मुंबईत परिणाम?

  Mumbai
  उत्तर प्रदेशातील राजकीय वादळाचा मुंबईत परिणाम?
  मुंबई  -  

  नागपाडा - उत्तर प्रदेशात गेले दोन दिवस उठलेल्या राजकीय वादळाचा परिणाम नागपाड्यातील सभेतही जाणवला. नागपाडयात आयोजित समाजवादी पक्षाच्या सभेत सपाचे प्रमुख मुलायमसिंह यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव या पिता पुत्र्यांचा एकही फोटो कोणत्याही बॅनरवर दिसून आला नाही. मात्र पक्षाच्या ज्या चिन्हासाठी लढा सुरु आहे, ती सायकल मात्र बॅनरवर झळकली. भविष्यात या पक्षात फुट पडल्यास नेमके कोणाकडे जायचं अशा संभ्रमात सपाचे मुंबईतील कार्यकर्ते आणि पदाधिकारी पडले आहेत. त्यामुळे मुंबईत कुठेही बॅनरवर या दोघांचे फोटो न लावता फक्त पक्षाचे चिन्ह असलेले बॅनर्स झळकताना दिसत आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.