Advertisement

'हा तर तरूणांचा अपमान', निरूपम यांची मंत्रालय परिसरात घोषणाबाजी


'हा तर तरूणांचा अपमान', निरूपम यांची मंत्रालय परिसरात घोषणाबाजी
SHARES

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बेरोजगारांनी पकोडे तळून रोजगार मिळवावा, असं संसदेत वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी शुक्रवारी 'पकोडा' आंदोलनाचं हत्यार उपसलं. मात्र मंत्रालयात पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने हे आंदोलन फसलं. मात्र हार न मानता निरूपम यांनी सोमवारी पुन्हा एकदा आंदोलनाचं अस्त्र बाहेर काढलं. मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करून त्यांनी ''पंतप्रधान नोकरी द्या… प्रधानमंत्री हाय हाय'' च्या घोषणा देत मंत्रालय परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय परिसरात अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. निरुपम यांनी मंत्रालयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता निरूपम यांना कार्यकर्त्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतलं.


लावणार होते भजीचे स्टाॅल

गेल्या शुक्रवारी निरूपम यांनी मंत्रालयासमोर 'पकोडे' अर्थात 'भजीचे' स्टॉल लावून आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र पोलिसांनी त्यांना गिरगावजवळ ताब्यात घेतल्याने त्यांचं आंदोलन फसलं. त्यानंतर त्यांनी सोमवारी मंत्रालयाजवळील आंबेडकर पुतळ्याजवळ आंदोलन करण्याची घोषणा केली. या अनुषंगाने पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला होता.


आश्वासनपूर्ती नाहीच

तरीही निरूपम आपल्या कार्यकर्त्यांसह या परिसरात पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात घोषणा द्यायला सुरूवात केली. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली नाही. कोट्यवधी तरूणांना रोजगार देण्याची घोषणा त्यांनी केली, मात्र तरुणांना त्यांनी रोजगार दिला नाही. पदवीधर तरुणांना पंतप्रधान मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी रस्त्यावर पकोडे तळण्याचा सल्ला दिला. हा देशातल्या तरुणांचा अपमान असून या विरोधात हे आंदोलन असल्याचं निरुपम यावेळी म्हणाले.



हेही वाचा-

पकोडा आंदोलनाचा सरकारला धसका, गिरगाव चौपाटीला अडवली निरूपम यांची गाडी


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा