Advertisement

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना तिकीट

काँग्रेसने घोषणा केली.

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना तिकीट
SHARES

लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीने अजूनही मुंबईतील उमेदवारी जाहीर केलेली नाही. दरम्यान, महाविकास आघाडीने  मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे.  मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड उमेदवारी जाहीर केली आहे. 

गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागावाटपावरुन तिढा सुरू असल्याची चर्चा सुरू होती. यात मुंबई आणि सांगली लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होती. काँग्रेसच्या वर्षा गायकवाडही उमेदवारीवरुन नाराज असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, आता वर्षा गायकवाड यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. 

महाविकास आघाडीमध्ये लोकसभेचं जागावाटप होऊन मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर मध्य हे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. मात्र, काँग्रेसला दक्षिण मध्य मुंबईची जागा हवी होती. तिथं वर्षा गायकवाड इच्छुक होत्या. मात्र, ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडं गेली आणि तिथून ठाकरेंच्या शिवसेनेनं अनिल देसाई यांना उमेदवारी दिली. त्यामुळं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यावर काँग्रेसनं उत्तर मध्य मुंबई हा उतारा शोधला आहे.

उत्तर मध्य मुंबई हा दहा वर्षांपूर्वीपर्यंत काँग्रेसचा गड होता. इथून सुनील दत्त हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून जात होते. त्यानंतर त्यांच्या कन्या प्रिया दत्ता इथून खासदार होत्या. 2014 नंतर चित्र बदललं आणि पूनम महाजन या इथून खासदार झाल्या.

राज्यातील सत्ता समीकरणं बदलल्यानंतर महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आला आहे. इथं माजी मंत्री नसीम खान, भाई जगताप यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, ती चर्चा हवेत विरली आहे.



हेही वाचा

"मते मागायला येतील, तुम्ही माती काढायला सांगा!" शिवाजी पार्कवासीयांची भूमिका

मतदानाच्या दिवशी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा