Advertisement

अवास्तव दर आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा- अस्लम शेख

काही रुग्णालयांकडून अवाजवी शुल्क आकारणी चालू असल्याने अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख (mumbai guardian minister aslam sheikh) यांनी बृहन्मुंबई पालिका आयुक्तांना दिले आहेत.

अवास्तव दर आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करा- अस्लम शेख
SHARES

राज्य शासनाने ३० एप्रिल २०२० रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेद्वारा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयांना (private hospital) कोरोना (coronavirus) व अन्य आजारांवरील उपचारांसाठी किती शुल्क आकारावे हे ठरवून दिलेलं असताना काही रुग्णालयांकडून अवाजवी शुल्क आकारणी चालू असल्याने अशा रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख (mumbai guardian minister aslam sheikh) यांनी बृहन्मुंबई पालिका आयुक्तांना दिले आहेत.

केराची टोपली

शेख यांनी पत्रात लिहिलंय की, लोकहिताचा विचार करुन शासनाने ३० एप्रिल २०२० रोजीच्या अधिसूचनेद्वारे रुग्णालयांना मार्गदर्शक तत्त्वे आखून दिलेली असताना काही रुग्णालये शासनाच्या अधिसूचनेकडे दुर्लक्ष करत त्याला केराची टोपली दाखवत आहेत. दिवसेंदिवस अशा स्वरुपाच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नफेखोरी करणाऱ्या या रुग्णालयांवर कठोर कारवाई होण्याची गरज आहे.

हेही वाचा - Coronavirus Update: मुंबईतील रुग्णालयांच्या अवास्तव दरआकारणीला चाप

पार्थिव अडवू नये

खाजगी रुग्णालयांकडून बिलासाठी मृत रुग्णांचे पार्थिव अडविण्यात येऊ नये, रुग्णालयाचे दर वेबसाईटवर व रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावेत, रुग्ण हक्क व जबाबदाऱ्यांची सनद दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात यावी व खाजगी रुग्णालयांना  राज्य शासनाने विहित केलेल्या दरांचं पालन करण्याची हमी देण्याबाबत रुग्णालयांना सूचित करण्यात यावं, असे निर्देश शेख यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

ठरलेले पॅकेज

मुंबई, पुण्यातील ज्या मोठ्या रुग्णालयांचे जीप्सा (जनरल इन्शुरन्स पब्लिक सेक्टर असोसिएशन) सोबत करार झाले आहेत आणि विविध आजाराच्या उपचारांसाठी विविध पॅकेजेस ठरलेले आहेत. रुग्णालयांनी कोरोना रुग्णांवर उपचार करताना जे दर निश्चित आहेत त्याप्रमाणेच आकारणी करायची आहे. मग रुग्ण कुठल्याही प्रकारच्या वॉर्डमध्ये का असेना त्यापेक्षा जास्त दर रुग्णालयांना आकारता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे हा निर्णय खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे.

दरसूची निश्चित

मुंबई, पुण्यातील ज्या रुग्णालयांचे जीप्सा सोबत करार नाहीत त्यांच्यासाठी दरसूची निश्चित करण्यात आली आहे. त्या दरसूचीपेक्षा अधिकची आकारणी मग रुग्ण कुठल्याही प्रकारच्या वॉर्डमध्ये असेल ती करता येणार नाही. उपचारादरम्यान, पीपीई किटस्, एन ९५ मास्क वापरल्यास खरेदी किमतीच्या १० टक्के वाढीव दर लावण्यास मुभा देण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रातील रुग्णालयांनी जे विविध थर्ड पार्टी अग्रीमेंट (टीपीए) त्यानुसार एकाच उपचारासाठी दर निश्चित केले आहेत त्यापैकी जनरल वॉर्डच्या किमान दरापेक्षा अधिकचे दर त्यांना आकारता येणार नाहीत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा