Advertisement

'ते ट्विट आपण नाही तर शिवसैनिकाने केलं होतं' त्या ट्विटवर किशोरी पेडणेकरांचं स्पष्टीकरण

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या ट्विटरवर लसींच्या ग्लोबल टेंडरसंबंधी प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्याचा बाप काढल्यानं सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल होत आहेत.

'ते ट्विट आपण नाही तर शिवसैनिकाने केलं होतं' त्या ट्विटवर किशोरी पेडणेकरांचं स्पष्टीकरण
SHARES

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (mumbai mayor kishori pednekar) या ट्विटरवर लसींच्या ग्लोबल टेंडरसंबंधी प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्याचा बाप काढल्यानं सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल होत आहेत. वाद निर्माण होताच किशोरी पेडणेकर यांनी हे ट्विट डिलीट केलं होतं. दरम्यान, या संपूर्ण वादावर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं असून 'ते ट्विट आपण नाही तर शिवसैनिकाने (shiv sena) केलं होतं', अशी माहिती दिली आहे. शिवाय ते आक्षेपार्य ट्विट करणाऱ्या शिवसैनिकाची हकालपट्टी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना किशोरी पेडणेकर यांना या वादासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी 'बीकेसीत मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी माझ्यासोबत शाखाप्रमुख आणि २ कार्यकर्ते होते. कार्यक्रम असताना मी मोबाइल माझ्याकडे ठेवत नाही. तसंच माझ्या मोबाइलला लॉक नसतो. मोबाइल पाहत असताना शिवसैनिकाने हे ट्विट केलं होतं', असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं.

'आता तर मला धडा मिळाला. कोणी किती जवळचा असला तर त्याच्याकडे मोबाइल देऊ नये हा धडाच यानिमित्ताने मिळाला आहे. आज ट्विट केलं आहे, उद्या काहीही होऊ शकतं', अशी भीती यावेळी त्यांनी व्यक्त केली.

नेमकं प्रकरण?

किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. ही मुलाखत त्यांनी आपल्या ट्विटरला शेअर केली होती. या मुलाखतीत त्यांनी एक कोटी लोकांना लस देण्यासंदर्भात पालिकेकडून काढण्यात आलेल्या ग्लोबल टेंडर तसंच त्याला कंपन्यांनी दिलेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला होता. या ट्विटवर एका व्यक्तीनं कंत्राट कोणाला दिले? असा प्रश्न विचारला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना ‘तुझ्या बापाला’ असं म्हटलं होतं. हे ट्विट व्हायरल होऊ लागल्यानंतर महापौरांवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली. सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागल्यानंतर महापौरांनी अखेर हे ट्विट डिलीट केलं.



हेही वाचा -

नेटकऱ्याचा बाप काढल्यानं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ट्रोल

महाराष्ट्र सरकारची हटके योजना,'कोरोनामुक्त गाव' स्पर्धेत ५० लाख जिंकण्याची संधी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा