Advertisement

नेटकऱ्याचा बाप काढल्यानं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ट्रोल

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांची जीभ घसरली आणि आता त्या ट्विटरवर ट्रोल होत आहेत.

नेटकऱ्याचा बाप काढल्यानं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ट्रोल
SHARES

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांची जीभ घसरली आणि आता त्या ट्विटरवर ट्रोल होत आहेत. त्यांनी एका नेटकऱ्याला दिलेल्या उत्तरामुळे त्या चांगल्याच ट्रोल (Kishori Pednekar trolled) होऊ लागल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केली होती. ही मुलाखत मुंबईतील १ कोटी लसीकरणाच्या संदर्भातील होती. ज्यामध्ये महापौर किशोरी पेडणेकर यांनी ग्लोबल कंत्राटाला ९ कंपन्यांचा प्रतिसाद मिळाल्याचा उल्लेख केला होता.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या या ट्विटवर एका नेटकऱ्यानं त्यांना प्रश्न विचारला की, कुठल्या कंपन्यांना लस पुरवठ्याचं कंत्राट दिलं आहे. यावर संतापलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्याला मराठीत उत्तर देत लिहिलं, "तुझ्या बापाला".

महापौर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना वापरलेल्या या शब्दांमुळे त्यांची चांगलीच फजिती झाली. अखेर त्यांनी आपलं हे ट्विट डीलिट केलं. मात्र, असं असले तरी त्यांच्या या ट्विटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.



हेही वाचा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा