Advertisement

मुंबई महापालिका निवडणुकीआधी राज ठाकरेंची मोठी घोषणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारपासून कोकण दौऱ्यावर आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीआधी राज ठाकरेंची मोठी घोषणा
SHARES

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजप आणि शिंदेंचा पक्ष हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र, या सर्व चर्चांना स्वत: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्णविराम दिला आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे बुधवारपासून कोकण दौऱ्यावर आहेत.

राज ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार, असे सांगितले. राज ठाकरेंनी केलेल्या घोषणनेंतर मनसेच्या दिपोत्सवात राज्यातील तिन्ही दिग्गज एकत्र आल्यानंतर सुरू झालेल्या महायुतीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

राजकीय पक्षांवर शिंतोडे उडवले गेले. त्यामुळे ज्यांना आमची ताकद बोचते, ते आरोप करतात. मी कुणासाठीच काम करत नाही. मी फक्त माझ्या पक्षासाठी महाराष्ट्रासाठी काम करतो, असे भाजपसोबतच्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

पक्षात अनेक अंतर्गत बदल होतील. आगामी निवडणुकीची ही तयारी समजा. कोणताही लढा हा प्रस्थापितांविरोधातच असतो. बालेकिल्ले हलतात. यापुढेही हलतील, असेही त्यांनी कोकण दौऱ्याआधी आज राज ठाकरे कोल्हापुरात बोलत होते. मुंबई महापालिका स्वतंत्र लढणार, असे यावेळी त्यांनी सांगितले.

अंबाबाई देवीच्या दर्शनाने कोकणच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. तसेच आज चांगला तांबडा, पांढरा रस्सा खाणार आहे. कोकणच्या दौऱ्याबाबत बरेच दिवस सुरू होते. तर उद्यापासू कोकण दौऱ्याला सुरुवात करणार आहे. तसेच कोकण संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र दौरा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.हेही वाचा

राज्यपालांच्या विधानानंतर उद्धव ठाकरे आक्रमक, महाराष्ट्र बंदचा इशारा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा