Advertisement

नवनीत राणा करणार मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण, पोलिसांकडून नोटीस

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. याचसंदर्भात त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

नवनीत राणा करणार मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण, पोलिसांकडून नोटीस
SHARES

मशिदींवरील भोंग्यांवरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेला भाजपकडून (BJP) पाठिंबा मिळतोय. खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. याचसंदर्भात त्यांनी आज मुंबईत (Mumbai) पत्रकार परिषद घेतली.

नवनीत राणा उद्या (शनिवारी) मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करणार आहेत. यावेळी त्या म्हणाल्या की, मी मुंबईची मुलगी आहे. विदर्भाची सून आहे. त्यामुळे मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यावर ठाम आहे.

राणा दाम्पत्य आज खार इथल्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यानंतर मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील वरिष्ठ आयपीएस अधिकारी मंजुनाथ शिंदे यांनी राणा दाम्पत्याची भेट घेऊन मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कुठलेच काम करू नका, असं आवाहन करत नोटीस बजावली.

पोलिसांच्या नोटीसवर त्यांनी म्हटलं की, मुंबईत वातावरण बिघडवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. शिवसैनिकांनी (Shiv sena) आम्हाला मुंबईत पाय ठेवून दाखवा, अशी धमकी दिली होती. पण आज आम्ही मुंबईत आहोत. त्यामुळे अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही.

त्या पुढे म्हणाल्या की, मुंबईच्या नागरिकांना त्रास देण्याचा आमचा कोणताही हेतु नाही. तरीदेखील पोलिसांकडून आज आम्हाला शांतता ठेवावी, अशी नोटीस देण्यात आली. हनुमान चालिसा म्हटल्यामुळे शांततेचा भंग होता का, असा सवाल रवी राणा यांनी केला.

पोलिसांनी नोटीस दिली असली तरी राणा यांचा निर्धार कायम आहे. त्या म्हणाल्या, उद्या आम्ही शांततेनेच मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालिसा म्हणणार आहोत. खरे शिवसैनिक आम्हाला विरोध करणार नाहीत. मात्र स्थिती बिघडल्यास त्याला शिवसैनिकच जबाबदार असतील.

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राणा दाम्पत्याचा बंटी-बबली असा उल्लेख केला. त्यावर नवनीत राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्या म्हणाल्या की, संजय राऊत हे पोपट आहेत. ते काहीही बोलतात आणि एक मिरची दिली की शांत बसतात.



हेही वाचा

राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला 'या' पक्षांचा विरोध

निवडणुकांमुळे दिल्ली, मुंबईत भाजपकडून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण - संजय राऊत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा