विरोधकांना देव सद्बुद्धी देवो - सुधीर मुनगंटीवार


  • विरोधकांना देव सद्बुद्धी देवो - सुधीर मुनगंटीवार
SHARE

मुंबई - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प शनिवारी विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्प सादर करत असताना विरोधकांनी सुरू केलेला गदारोळ शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिला. त्या गदारोळातच सुधीर मुनगंटीवार यांनी 62 हजार 844 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा असल्याचं या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलंय. हा अर्थसंकल्प राज्याचं उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. तर विरोधकांनी अर्थसंकल्प जाळला त्यावर त्यांनी विरोधकांना सद्बुद्धी देवो अशी प्रतिक्रिया दिलीय.


'अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प'

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याचं आश्वासन देऊनही अर्थसंकल्पात त्याबाबत काहीही ठोस भूमिका मांडण्यात आली नसल्याचं सांगत विरोधकांनी अर्थसंकल्प अपेक्षाभंग करणारा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

'समतोल अर्थसंकल्प'

विरोधकांनी जरी अर्थसंकल्पावर कडक शब्दांत टीका केली असली तरी सत्ताधाऱ्यांनी मात्र हा अर्थसंकल्प विकासाभिमुख असल्याचं म्हटलंय. विशेषत: शिवसेनेने अर्थसंकल्पाला पाठिंबा देताना सावध भूमिका घेतली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या