राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी जाहीर केलं की, पुढील विधानसभा निवडणुकीनंतरही महाविकासआघाडी (MVA) सत्ता कायम ठेवेल. २०२४ मध्ये देखील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील.
आव्हाड म्हणाले, “सत्ताधारी भागीदारत असणारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुढील विधानसभा निवडणूक एकत्र लढतील आणि राज्यात पुन्हा सत्तेवर येतील. २०२४च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असा निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच घेतला आहे.
२०२४ मध्ये ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या दाव्याला आव्हाड यांचे विधान पाठिंबा देणारे आहे. याशिवाय, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्याशी झालेल्या स्वतंत्र बैठकीनंतर राऊत यांनी एमव्हीए एक मिनी-यूपीए असल्याचं ठासून सांगितलं आणि एका मजबूत विरोधी पक्षाची बाजू मांडली.
२०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मुकाबला करण्यासाठी तीन-चार भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष आणि समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची घोषणा पवारांनी वारंवार केली आहे. शिवसेनेचे खासदार राऊत यांनीही राहुल यांना बिगरभाजप आघाडीसाठी विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे.
तीन सत्ताधारी भागीदारांमध्ये समन्वय आणि जवळीक वाढलेली असताना आणि ते एकजुटीनं भाजपच्या टीकेला तोंड देत असताना आव्हाड यांचे विधानही महत्त्वाचे आहे. तिन्ही पक्षांनी वेळोवेळी भाजपला रोखणं हेच आपले उद्दिष्ट असल्याचं जाहीर केलं आहे. युतीचा निर्णय त्यांनी स्थानिक पातळीवर सोडला आहे.
आगामी स्थानिक आणि प्रशासकिय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तिन्ही पक्षांनी एकट्यानं लढण्याची घोषणा केली आहे. असं असलं तरी वरिष्ठ नेत्यांनी भाजपच्या विरोधात एकत्र लढण्याची जोरदार तयारी केली आहे.
आव्हाड म्हणाले की, विरोधकांच्या सततच्या हल्ल्यांनंतरही राज्याच्या विकासासाठी तीन भागीदार एका संघाप्रमाणे काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांवर कोणताही दबाव नाही; ते स्वतंत्रपणे निर्णय घेतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून त्यांना निर्णय घेणे कठीण करत असल्याच्या अफवांमध्ये तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांना पवारांचा पूर्ण पाठिंबा आहे.”
आव्हाड म्हणाले की, पवारांनी पक्षाच्या मंत्री आणि कार्यकर्त्यांना मुख्यमंत्रीपदाचा आदर करायला आणि घेतलेल्या निर्णयांचे स्वागत करायला शिकवले.
हेही वाचा