Advertisement

राज्यात भाजपा-सेनेविरूद्ध समविचारी पक्षांची महाआघाडी

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत राज्यात भाजपा-सेनेविरूद्ध समविचारी पक्षांची महाआघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला. जवळपास तासभर चाललेल्या बैठकीत दोन्ही पक्षांतील प्रमुख नेते उपस्थित होते.

राज्यात भाजपा-सेनेविरूद्ध समविचारी पक्षांची महाआघाडी
SHARES

पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेविरूद्ध लढण्यासाठी समविचारी पक्षांची महाआघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी रात्री झालेल्या संयुक्त बैठकीत घेतला.


तासभर चर्चा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जवळपास तासभर झालेल्या या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, संजय निरूपम, शरद रणपिसे, नसीम खान, विजय वडेट्टीवार, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर आदी नेते उपस्थित होते.


काँग्रेस-राष्ट्रवादी घेणार पुढाकार

येत्या निवडणुकीत देशात महाआघाडी होईलच. पण, राज्यात त्याची सुरूवात करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पुढाकार घेतील. यासाठी विखे पाटील यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. दोन्ही पक्षांचे नेते इतर समविचारी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतील. त्यानंतर महागठबंधनाला आकार येण्यास सुरूवात होईल आणि त्यातून येणारा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळविण्यात येईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं.



हेही वाचा-

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा- उद्धव ठाकरे

शिवसेनेला स्वत: ची भूमिकाच नाही- राज ठाकरे



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा