Advertisement

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा- उद्धव ठाकरे

मराठा समाजातील निरपराध तरूणांवर गुन्हे नोंदवण्यात आले.पोलिसांकडे काही पुरावे असतील तर जरूर अटक करा. पण मुख्यमंत्र्यांनी निरपराध तरूणांवरील गुन्हे मागे घेण्याचा जो शब्द दिला होता, तो शब्द पाळावा, असं आवाहन उद्धव यांनी केलं.

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा- उद्धव ठाकरे
SHARES

मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला दिलेला शब्द पाळावा आणि मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांसोबत बरोबर बोलताना केली. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मंगळवारी दुपारी उद्धव यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते.


मुख्यमंत्र्यांनी शब्दा पाळावा

शिवरायांचा मावळा महाराष्ट्र पेटवणारा नाही. मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यानेच राज्यात ठोक मोर्चे निघाले. समाजकंटकांनी या मोर्चात घुसून तोडफोड केली. तरीही समाजातील निरपराध तरूणांवर गुन्हे नोंदवण्यात आले.पोलिसांकडे काही पुरावे असतील तर जरूर अटक करा. पण मुख्यमंत्र्यांनी निरपराध तरूणांवरील गुन्हे मागे घेण्याचा जो शब्द दिला होता, तो शब्द पाळावा, असं आवाहन उद्धव यांनी केलं.


कायद्याचं विघ्न दूर करा

सध्या कायद्याचा चुकीचा वरवंटा आंदोलकांच्या घरावर फिरत आहे. गणेशोत्सवात आंदोलकांवरील कायद्याचं हे विघ्न दूर करावं. या मुद्द्यावरून समाजातील वातावरण बिघडण्याच्या, परिस्थिती वाईट होण्याच्या आत मराठा समाजाला न्याय द्यावा, असंही त्यांनी म्हटलं.


शिवसेना मराठा समाजासोबत

शिवसेना मराठा समाजाच्या बरोबर आहे. याबरोबर धनगर समाज, महादेवी कोळी इ. समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा आहे. मराठा समाजासह इतर समाजानेही न्यायासाठी सरकारकडे पाठपुरावा केला आहे. या सर्व समाजांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेचं विशेष अधिवेशन कधी भरवणार? असा प्रश्नही उद्धव यांनी सरकारला विचारला.


शिवसेना सत्तेतील भागीदार आहे. त्यामुळे मराठा समाजाचा आवाज शासन दरबारी पोहोचवण्यासाठीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यात आली. राज्यात ठिकठिकाणी १० हजार ७०० मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. कोपर्डी बलात्कार प्रकरण जलदगती न्यायालयात अडकलं आहे. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही आम्ही केली.
- बबनराव सुद्रीक, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक



हेही वाचा-

मराठा आरक्षण: मागासवर्ग अायोग १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करणार अंतिम अहवाल

शिवसेनेला स्वत: ची भूमिकाच नाही- राज ठाकरे



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा