Pali Hill
  सचिन अहिर यांची पंतप्रधानांवर टीका

  सचिन अहिर यांची पंतप्रधानांवर टीका

  Share
  Now
  मुंबई  -  

  वांद्रे - राष्ट्रवादी काँग्रेसनं सांताक्रूझच्या दौलतनगरमध्ये 1 डिसेंबरला परिवर्तन सभेचं आयोजन केलं होतं. या वेळी वॉर्ड क्रमांक 79 चे इच्छुक उमेदवार उमर सोळंकी आणि जिल्हा उपाध्यक्ष आसिफ भमला यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष आसिफ भमला म्हणाले की, आज देशातील जनतेला ज्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे, तो भाजपा सरकारमुळेच. मात्र भाजपा सरकार बीकेसीत होणाऱ्या कोल्ड प्लेसारख्या कार्यक्रमात व्यस्त आहे. राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना म्हणाले की, देशाला मेक इन इंडिया बनवण्यापेक्षा मोदींनी देशाला मागे पाडलं आहे. या कार्यक्रमात उमर सोळंकींनी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटनही केलं.

  Share
  Now
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.